पुणे - पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील तळमजल्यावर असलेल्या इलेक्ट्रॉनिक टेलिफोन एक्स्चेंज आणि वायरलेस सर्व्हर रूमला शनिवारी सकाळी साडेआठ वाजता आग लागली. या आगीत सर्व्हर कक्षातील आठ संगणक, चार वायरलेस सेट, पाच प्रिंटर, व्हाइस लॉकर मशीन, फर्निचर जळून खाक झाले. आगीत सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
शनिवारी सकाळी काही कर्मचारी आयुक्तालयातील ड्यूटीवर आले होते. या वेळी आग लागल्याचे एका कर्मचा-याच्या लक्षात आले. त्याने याबाबत तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. काही तासांच्या परिश्रमानंतर जवानांनी ही आग आटोक्यात आणली.