पुणे- पुणे जिल्ह्यातील आंबेगाव विधानसभा मतदारसंगातील भाजपचे उमेदवार जयसिंग एरंडे यांच्या गाडीतून बुधवारी रात्री पोलिसांनी 21 लाख रूपये जप्त केले. एरंडे यांचा मुलगा ही गाडी घेऊन येत असताना पोलिसांनी आंबेगाव टोलनाक्यावर आडवून तपासणी केली असता त्यात ही रोकड आढळून आली. पोलिसांनी ही रक्कम जप्त केली असून, पुढील कारवाई सुरु करण्यात आली आहे. हे पैसे भाजपचे उमेदवार एरंडे यांच्यासाठीच चालवले असल्याची माहिती कार चालकाने दिली आहे.