आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस दलातील जोडप्याने केले ‘माउंट एव्हरेस्ट’ सर! ठरले पहिलेच भारतीय कपल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे पोलिस दलातील दिनेश राठोड आणि तारकेश्वरी राठोड या दाम्पत्याने एव्हरेस्ट शिखर सर केले तो क्षण... - Divya Marathi
पुणे पोलिस दलातील दिनेश राठोड आणि तारकेश्वरी राठोड या दाम्पत्याने एव्हरेस्ट शिखर सर केले तो क्षण...
पुणे - महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या तारकेश्वरी भालेराव राठोड आणि दिनेश राठोड या जोडप्याने अथक प्रयत्नांना साहसाची जोड देत जगातले सर्वोच्च शिखर असणारे माउंट एव्हरेस्ट सर केले आहे. अशा प्रकारे पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या जोडप्याने माउंट एव्हरेस्ट सर करण्याची ही पहिलीच घटना असल्याचा दावा, या साहसी जोडप्याने मंगळवारी काठमांडू येथे केला.

तारकेश्वरी भालेराव या पोलिस नाईक असून शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात कार्यरत आहेत. त्यांचे पती दिनेश राठोड हेही मुख्यालयात काम करतात. दोघेही क्रीडापटू म्हणून प्रसिद्ध आहेत. एव्हरेस्ट सर केल्यावर आपल्या भावना व्यक्त करताना भालेराव दांपत्य म्हणाले,‘एव्हरेस्ट हे आमचे दोघांचेही स्वप्न होते. आम्ही दोघेही ३० वर्षांचे आहोत. सन २००६ पासून पोलिस दलात काम करत आहोत. सन २००८ पासून आम्ही या सर्वोच्च शिखरावर चढाईचे स्वप्न पाहिले होते. ते आज पूर्ण झाल्याचा विलक्षण आनंद आहे.’

यंदाच्या सीझनमध्ये एकूण ७० भारतीयांनी एव्हरेस्ट मोहीम यशस्वी केली आहे. आमच्या मोहिमेत शेर्पा फुर्बा आणि फुशेम्बा यांनीही एव्हरेस्टवर पाऊल ठेवले. ‘मकालू अॅडव्हेंचर’च्या वतीने या मोहिमेची आखणी करण्यात आली होती.

अाधी एव्हरेस्ट मग अपत्याचा विचार
तारकेश्वरी म्हणाल्या,‘आधी एव्हरेस्ट आणि मग बाळाचा विचार, हेही आम्ही ठरवले होते. आता अतिशय अभिमानाने आम्ही पालकाची भूमिका स्वीकारण्याचा विचार करत आहोत.’ दिनेश राठोड म्हणाले, ‘यंदा एव्हरेस्टवरील चढाईचा काळ सुरू झाल्यावर लगेचच पश्चिम बंगालचे तीन गिर्यारोहक एव्हरेस्ट चढाईच्या मोहिमेत जीव गमावून बसले, या घटनेचे खूप दु:ख झाले. पण आमचा निर्धार कायम ठेवत आम्ही प्रयत्न सुरू ठेवले. गेल्या वर्षीही आम्ही प्रयत्न केला होता, पण तेव्हा नेपाळ सरकारने भूकंपाचे कारण देत चढाईला नकार कळवला होता. या चढाईपूर्वी आम्ही ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च दहा शिखरे, तसेच इतर काही हिमशिखरे चढून सराव केला होता. काही साहसी क्रीडाप्रकारांतही भाग घेतला होता.’
पुढे पाहा, महाराष्ट्र पोलिस दलातील कोणी कोणी पार केले आहे एव्हरेस्ट शिखर....
बातम्या आणखी आहेत...