आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरिष्ठांच्या जाचामुळेच गर्भपात; बडतर्फ पाेलिस दांपत्याचा अाराेप, ‘एव्हरेस्ट’चे रामायण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एव्हरेस्ट सर केल्याबद्दल नेपाळकडून मिळालेले प्रमाणपत्र पत्रकारांना दाखवताना तारकेश्वरी व दिनेश राठाेड. - Divya Marathi
एव्हरेस्ट सर केल्याबद्दल नेपाळकडून मिळालेले प्रमाणपत्र पत्रकारांना दाखवताना तारकेश्वरी व दिनेश राठाेड.
पुणे - एव्हरेस्ट शिखर सर केल्याचा खाेटा दावा केल्याचा ठपका ठेवत पुण्यातील पाेलिस दांपत्य  दिनेश राठाेड व तारकेश्वरी राठाेड यांना पाेलिस दलातून बडतर्फ करण्यात अाले अाहे. मात्र अापण खराेखरच एव्हरेस्ट सर केल्याचा पुनरुच्चार या दांपत्याने शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन केला.
 
तसेच पाेलिस अायुक्त व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात अापला मानसिक व शारीरिक छळ केला, असा अाराेपही त्यांनी केला. ‘तारकेश्वरी नऊ महिन्यांची गर्भवती असताना, पाेलिस अायुक्तांच्या त्रासामुळे तिचा गर्भपात झाला. या बाळाच्या मृत्यूस पाेलिस अायुक्त रश्मी शुक्ला जबाबदार असून अाम्हाला त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार अाहाेत,’ असा इशाराही राठाेड दांपत्याने दिला अाहे.   
 
दिनेश राठाेड म्हणाले, २३ मे २०१६ राेजी अाम्ही एव्हरेस्ट सर केले. त्याबाबत नेपाळ सरकारचे प्रमाणपत्र अामच्याकडे अाहे. नेपाळ सरकारने अामच्यावर काेणतीही बंदी टाकलेली नसताना, दहा वर्षांची बंदी घातल्याच्या चुकीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. गिर्याराेहक एजंट सुरेंद्र शेळके व अंजली कुलकर्णी यांच्या सांगण्यावरून पाेलिस अायुक्त रश्मी शुक्ला, पाेलिस उपायुक्त अरविंद चावरिया, पाेलिस उपायुक्त शेषराव सूर्यवंशी, सहायक पाेलिस अायुक्त गणपतराव माडगूळकर, पाेलिस निरीक्षक कविता नेरकर या सर्वांनी एजंटशी लागेबांधे करून, पदाचा गैरवापर करत अामची मानसिक, शारीरिक व अार्थिक छळवणूक केली अाहे.’   
 
बडतर्फची नाेटीस मिळाली नाही  
तारकेश्वरी राठाेड म्हणाल्या, एव्हरेस्ट माेहिमेवरून परतल्यानंतर अाम्हाला पाेलिस खात्यातून निलंबित केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर पाच दिवसांनी अाम्हाला निलंबनाची नाेटीस मिळाली. अाता अाम्हाला बडतर्फ केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या असल्या तरी अद्याप तशी नाेटीस अाम्हाला मिळालेली नाही. विभागीय चाैकशी सुरू असतानाच तसेच ‘मॅट’मध्ये प्रकरण असताना अशा प्रकारे बडतर्फ कारवाई करता येऊ शकत नाही. याप्रकरणी अाम्ही मानवाअधिकार अायाेगाकडे जाणार अाहाेत.  तसेच बाळाच्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय महिला अायाेगाकडे तक्रार करून दाद मागितली अाहे.’   

पाेलिसांची चाैकशीच बेकायदा
राठाेड यांचे वकील रमेश खेमू राठाेड म्हणाले, याप्रकरणी पाेलिस महासंचालक सतीश माथूर यांच्याकडे दाद मागण्यात अाली. मात्र, त्यांनी हा खासगी प्रश्न असल्याचे सांगत पाेलिस अायुक्तांची पाठराखण केली. राठाेड दांपत्य हे स्वखर्चाने वैयक्तिकरीत्या सुटी टाकून एव्हरेस्ट माेहिमेवर गेले हाेते.  त्यामुळे याप्रकरणी अायुक्तांनी त्यांच्यावर निलंबन, बडतर्फीची कारवाई करणे चुकीचे अाहे. तसेच याप्रकरणी बेकायदा चाैकशी करण्याचा त्यांना अधिकार नाही. दुसरीकडे, पाेलिस अायुक्त शुक्ला यांच्या वतीने बांधकाम व्यावसायिकाकडे २५ लाखांची खंडणी मागणारे गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक धनंजय धुमाळ यांच्याविराेधात मात्र अद्याप गुन्हा दाखल करण्यात अाला नाही. त्यांना शुक्ला पाठीशी घालत अाहेत, असा अाराेपही त्यांनी केला.

राठाेडमुळे पाेलिसांची प्रतिमा मलिन : शुक्ला
राठाेड दांपत्याचे अाराेप पाेलिस अायुक्त रश्मी शुक्ला यांनी फेटाळून लावले अाहेत. ‘राठाेड पती-पत्नी सन २०१५ मध्ये पाेलिस महासंचालकांकडून सुटी मंजूर करून घेऊन गेले हाेते. या माेहिमेसाठी त्यांना पाेलिस कल्याण निधीतून दाेन लाखांची मदतही देण्यात अाली हाेती. त्यावेळी भूकंपामुळे त्यांची माेहीम रद्द झाली. सन २०१६ मध्ये त्यांना पुन्हा एव्हरेस्ट सर करण्यासाठी परवानगी देण्यात अाली.  माेहीम संपल्यावर त्यांनी कर्तव्यावर हजर हाेणे, माेहिमेचा अहवाल देणे अावश्यक हाेते. मात्र अातापर्यंत ते विनापरवाना गैरहजर राहिले. अहवालही दिलेला नाही.  बनावट फाेटाे सादर करून त्यांनी नेपाळ पर्यटन विभागाकडून एव्हरेस्ट सर केल्याचे प्रमाणपत्र मिळविले. या कृत्यामुळे महाराष्ट्र पाेलिसांची बदनामी झाली अाहे,’ असा दावा शुक्ला यांनी केला.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, एव्हरेस्टबाबत दावा खाेटा, अाता शिस्तभंगाची कारवाई...
बातम्या आणखी आहेत...