आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एव्हरेस्ट सर केल्याचा सोंग करणारे पोलिस दांपत्य अखेर बडतर्फ, 2016 मध्ये झाले होते निलंबन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राठोड दांपत्याने एव्हरेस्ट सर केल्याचा दावा केल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला होता. - Divya Marathi
राठोड दांपत्याने एव्हरेस्ट सर केल्याचा दावा केल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला होता.
पुणे - एव्हरेस्ट सर केल्याचा खोटा दावा करणाऱ्या कॉन्स्टेबल दिनेश आणि तारकेश्वरी राठोड या दांपत्याला अखेर नोकरी गमवावी लागली आहे. बनावट फोटोशूट करून सर्वोच्च शिखर गाठल्याचे नाटक करणाऱ्या या दांपत्याचा पुणे पोलिसांकडून आणि विविध स्तरातून सत्कार करण्यात आला होता. मात्र, 2016 मध्ये त्यांचा हा सोंग उघडकीस आल्यानंतर त्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. आता या दांपत्याला थेट बडतर्फ करण्यात आले आहे. 
 

पुण्यातील शिवाजीनगरला होतो कार्यरत
- पुण्यातील शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत राहिलेल्या राठोड दांपत्याने 23 मे 2016 रोजी एव्हरेस्ट सर केल्याचा दावा केला होता. 
- आपला दावा खरा ठरवण्यासाठी दिनेश आणि तारकेश्वरीने नेपाळला 5 जून 2016 रोजी एक पत्रकार परिषद सुद्धा आयोजित केली होती. यात त्यांनी एव्हरेस्ट मोहिमेशी संबंधित छायाचित्रे आणि प्रमाणपत्र सुद्धा सार्वजनिक केले. 
- याच फोटोंवर माउंटेनियरिंग क्लबशी संबंधित 8 सदस्यांनी त्यांच्या विरुद्ध पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे तक्रार केली होती. 
- रश्मी शुक्ला यांनी या प्रकरणाच्या अंतर्गत चौकशीचे आदेश दिले होते. याचा अहवाल पाहून नोव्हेंबर 2016 मध्ये दोघांना निलंबित करण्यात आले होते. 
- यानंतर आता या दोघांनाही नोकरीवरून काढल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 
 
 
चौकशीत हे समोर आले
- राठोड दांपत्याने केलेल्या दाव्याच्या विरोधात पश्चिम बंगालचे माउंटेनिअर सत्यरूप सिद्धांत यांनी आरोप लावला होता. त्यांनी या कपल्सच्या एव्हरेस्टचे फोटोज खोटे असल्याचे सांगितले. 
- या फोटोजची पुण्यातील सायबर फॉरेन्सिक लॅबमध्ये चाचणी झाली. त्यातून हे फोटोज खोटे असल्याचे सिद्ध झाले.
- एव्हरेस्ट सर करतानाच्या फोटोजमध्ये या कपलने घातलेले कपडे आणि शूज विविध फोटोजमध्ये वेग-वेगळे असल्याचे दिसून आले. एव्हरेस्ट सर करताना वेळोवेळी कपडे आणि शूज बदलणे अशक्य आहे. 
- दिनेशच्या फोटोबद्दल बोलावयाचे झाल्यास त्याने शिखरावर पोहोचल्यानंतर लाल आणि काळ्या रंगाचा लांब जॅकेट घातला होता. तर, दोघांच्या एकत्रित फोटोमध्ये कपडे आणि शूज दोन्ही वेगळे होते. 
- नेपाळला जाऊन एव्हरेस्ट खोटे दावे करणाऱ्या या दांपत्यावर नेपाळच्या पर्यटन मंत्रालयाने सुद्धा 10 वर्षांची बंदी लावली आहे.
बातम्या आणखी आहेत...