आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फायरिंगच्या दोन घटनांसह अनेक प्रकरणातील सराईत गुन्हेगार असिफ पुणे पोलिसांच्या जाळ्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असिफकडून 1 डबल बोर गावठी कट्टा, 1 देशी बनावटीचे पिस्टल जप्त करण्यात आले. - Divya Marathi
असिफकडून 1 डबल बोर गावठी कट्टा, 1 देशी बनावटीचे पिस्टल जप्त करण्यात आले.
पुणे - सराईत गुन्हेगार आणि फायरिंगच्या दोन प्रकरणासंह अनेक गु्न्ह्यात पोलिसांना हवा असलेला असिफ युसूफ खान याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील गवळी आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

खंडणी विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील गवळी यांना मिळालेल्या माहितीवरुन रवी पुजारी आणि सध्या सुरेश पुजारी टोळीतील सराईत गुंड असिफ युसूफ खान (वय 38) रा.खांडवेनगर ,लोहगाव याला सापळा रचून पकडण्यात आले आहे. त्याच्या कडून 1 डबल बोर गावठी कट्टा, 1 देशी बनावटीचे पिस्टल असा 91,600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई चंदन नगर खराडी बायपास येथे करण्यात आली. असिफ विरोधात चंदन नगर पोलीस स्टेशनला आर्म ऍक्ट 3 (25) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
अनेक प्रकरणात हवा होता असिफ 
असिफ युसूफ खान हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून तो व त्याचा साथीदार सादिक बंगाली यांचा अनेक दिवसापासून पोलिस शोध घेत होते.
असिफवरील गंभीर गुन्हे 
1) भूमराज बिल्डर फायरिंग
नवी मुंबई येथील भूमराज बिल्डरवर फायरिंग केल्या प्रकरणी असिफवर तुर्भे पोलिस स्टेशनमध्ये  गुन्हा ( 415/06     कलम 307,452,34 आर्म ऍक्ट 3( 25) सह मोक्का कायदा ) नोंद आहे. 
 2) एकता बिल्डर फायरिंग 
एकता बिल्डर वरील फायरिंग प्रकरणी कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये कलम 307,452,34 आर्म ऍक्ट 3 (25) नुसार गुन्हा दाखल आहे. 
या गुन्ह्यांसह 7 चोरीच्या केसेस दाखल आहेत. कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात पोलिस 2 वर्षांपासून असिफचा शोध घेत होते. 
बातम्या आणखी आहेत...