आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थळ बदलल्याने अाेवेसींच्या सभेला पुण्यात परवानगी, भवानी पेठेत करणार भाषण (महाकाैल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुणे महापालिकेच्या निवडणुकीकरिता एमअायएम पक्षाचे खासदार असदुद्दीन अाेवेसी यांची १४ फेब्रुवारी राेजी कासेवाडी येथे सभा अायाेजित केली. मात्र सुरक्षेच्या व कायदा-सुव्यवस्थेच्या सभेच्या स्थळाला अाक्षेप घेतल्याच्या कारणावरून पाेलिसांनी या सभेला परवानगी नाकारली हाेती.
 
त्यामुळे एमअायएमने सभेकरिता तीन नवीन जागांची निवड करून त्याबाबतचा अर्ज पाेलिसांकडे दिला. पक्षाच्या विनंतीनुसार पाेलिसांनी टिंबर मार्केट, भवानी पेठ या ठिकाणी अाेवेसी यांच्या सभेला अखेर परवानगी दिली.  

एमअायएमचे महाराष्ट्र काेअर समितीचे सदस्य अंजुम इनामदार यांनी सांगितले की, कासेवाडी येथील ठिकाण अपुरे व प्रचारसभेच्या दृष्टीने याेग्य नसल्याने पाेलिसांनी सभेला या जागी परवानगी नाकारली. त्यामुळे सावित्रीबार्इ फुले स्मारक टिंबर मार्केट, भवानी पेठ, काेंढवा अाणि डेक्कन काॅलेज अशा तीन ठिकाणच्या जागांचा प्रस्ताव अाम्ही पाेलिसांकडे दिला हाेता.
 
दरम्यान, कासेवाडी ठिकाण हा संवेदनशील भाग असून या परिसरात विविध पक्षाच्या रॅली अाणि पदयात्रा सुरू अाहेत. त्यामुळे कायदा अाणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ शकताे, अशी भूमिका पाेलिसांनी स्पष्ट केली हाेती. अाता टिंबर मार्केट येथील सभेला परवानगी देण्यात अाली अाहे. 
पक्षाचे अामदार इम्तियाज जलील, प्रदेश अध्यक्ष सय्यद माेर्इन, रिपब्लिकन युवा माेर्चाचे नेते राहुल ढबाळे हे या सभेच्या वेळी उपस्थित राहणार अाहेत.
 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...