आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात कॉकटेल पार्टीवर पोलिसांची धाड, मद्यधुंद 60 तरुण-तरुणींना पकडले!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ताब्यात घेतलेल्या सर्व मुला-मुलींना खासगी बसमधून यशवंतराव चव्हाण रुग्णालयात मेडीकलकरीता नेण्यात आले. - Divya Marathi
ताब्यात घेतलेल्या सर्व मुला-मुलींना खासगी बसमधून यशवंतराव चव्हाण रुग्णालयात मेडीकलकरीता नेण्यात आले.
पुणे- पुण्यातील आयटी पार्क परिसर म्हणून वेगाने विकसित झालेल्या हिंजवडीजवळील नेरे गावात एका बांधकाम व्यावसायिकाच्या फॉर्म हाऊसवर कॉकटेल रंगलेल्या पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. नेरे गाव हे हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोडते. हिंजवडी पोलिसांनी या पार्टीची कुणकुण लागताच मध्यरात्री 3 च्या सुमारास धाड टाकली. यावेळी 50-60 तरूण-तरूणी मद्यधुंद अवस्थेत आढळून आले. दारूच्या बाटलीचा खच व काही कंडोम्सची पाकिटे मिळून आल्याचे हिंजवडी पोलिसांनी दावा केला आहे.
यात काही महाविद्यालयीन तरूण-तरूणी आहेत तर काही आयआयटीन्स आहेत. पुणे शहरातील एका प्रतिष्ठीत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा या पार्टीत सहभाग असल्याचे समोर आले आहे. या सर्व तरूण-तरूणींना पिंपरीतील वायसीएम रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे.या पार्टीत ड्रग्जचा वापर करण्यात आला आहे काय याचा तपास पोलिस करीत आहेत. या कॉकटेल पार्टीसाठी परवानगी घेतली नसल्याचे हिंजवडी पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांनी फक्त मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले. या सर्वांना समझ देऊन सोडून देण्यात आले. तर फॉर्म हाऊस मालकावर गुन्हा दाखल झाला आहे. फॉर्म हाऊस पिंपरीतील बांधकाम व्यावसायिक जमतानी यांच्या मालकीचे आहे.
पुढे पाहा, या तरूण-तरूणीची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...