आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pune Police Given Permission To Owaisi Visit On Certain Conditions

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुस्लिम आरक्षण परिषदेत खासदार ओवेसींचे जोशपूर्ण भाषण, सर्वच राजकीय पक्षांवर हल्लाबोल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- एमआयएमचे खासदार असाऊद्दीन ओवेसी यांनी अखेर पुण्यातील मुस्लिम आरक्षण परिषदेत दणकेबाज भाषण करीत मुस्लिमांच्या मागासलेपणावरून सर्वच राजकीय पक्षांवर सडकून टीका केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल करतानाच भाजप-शिवसेनेवरही कोरडे ओढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शेलक्या भाषेत टीका करताना मुस्लिमांवर सर्वत्र अन्याय होत असल्याचा टाहो फोडला. ओवेसींच्या भाषणाला मुस्लिम तरूणांनी टाळ्या व शिट्ट्या वाजवून प्रतिसाद दिला.
पुण्यातील कोंढवा परिसरातील कौसरबाग येथे झालेल्या सभेत ओवेसी काय काय म्हणाले.. वाचा ठळक मुद्दे...
- मुस्लिम तरूण तुरुंगात सडताहेत तर संजय दत्त सिक्स पॅक बनवितो आहे,
- अमित शहा यांचा खटला 7 महिन्यात निकाली निघतो तर मुस्लिम तरूण 10-10 वर्षे तुरूंगात सडताहेत
- बॉम्बस्फोटाचे खटले रोजच्या रोज चालवा, दोषी असेल तर फासावर चढवा पण निर्दोष असेल तर त्याला सोडून द्या, तुरुंगात सडवू नका
- 11 टक्के मुस्लिम समाज असूनही केवळ 2.2 टक्के मुस्लिम तरूण पदवीधर होत आहेत
- आम्हाला मासे नको पण मासे पकडण्याचे प्रशिक्षण तरी द्या
- महाराष्ट्रातील 70 लाख मुस्लिम गरीब आहेत
- महाराष्ट्र सरकारमध्ये एकही आयएएस अधिकारी मुस्लिम का नाही
- मुस्लिम मुले डॉक्टर, इंजिनिअर, आयपीएस का होत नाहीत
- देशातील विविध कमिशनने मुस्लिम समाज शिक्षणात मागास व दारिद्री रेषेत असल्याचे सांगितल्यानंतर त्याकडे का दुर्लक्ष केले जाते
- सच्चर, रंगनाथन समितीच्या शिफारशीचे काय झाले, कोर्टानेही मुस्लिम मागास असल्याचे मान्य केले आहे
- मराठ्यांना पण आरक्षण द्या पण मुस्लिमांना नाही म्हणू नका- भाजप सरकारला टोला
- सबका साथ, सबका विकास मग मुस्लिमाना आरक्षण का नाकारता
- मुस्लिमांना आरक्षण दिले तर त्यांचा जलद विकास होईल व राज्य, राष्ट्र संपन्न होईल
- आम्ही हिंदुस्थानी आहोत, आमच्या राष्ट्रभक्तीबाबत शंका नको
- पाकिस्तानी हाफिज सईदविरोधात सर्वप्रथम आम्ही भूमिका मांडली
- पुण्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये किती मुस्लिम तरूणांना प्रवेश मिळतो
- भाजप-शिवसेनेसोबत मैत्री शक्य नाही
- मागील काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने मुस्लिमांसाठी काहीही केले नाही
पुढे स्लाईडमध्ये पाहा, ओवेसींच्या सभेला काही अटींवर दिली होती परवानगी... कोणत्या होत्या अटी, वाचा...