आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेधूंद वातावरणात सुरु होता अश्लिल डांस, पुणे ग्रामीण पोलिसांनी बंद केली छमछम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - महाराष्ट्रात डांसबारवर गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी बंदी घातली असली तरी लपून-छपून छमछम सुरुच आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी लोणावळा येथील दीपा बारवर छापा मारून 30 महिलांसह ग्राहकांना अटक केली आहे. बाहेरून पाहिले तर एखाद्या रेस्टॉरंट सारखे दिसणा-या या बारमध्ये गेल्या काही महिन्यांपासून डांसबार सुरु होता. याची माहिती मिळाल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी छापा मारला तेव्हा तिथे, नशेत तरर्र झालेल्या ग्राहकांच्या इशा-यावर बारबाला नाचत होत्या. ग्राहक आणि बार चालकही या छमछममध्ये एवढे धूंद झाले होते की, पोलिसांनी छापा टाकल्याचे त्यांच्या गावी नव्हते. बेधूंद होऊन नाचत असलेल्या मुलीही ग्राहकांना अश्लिल इशारे करीत होत्या आणि ग्राहक त्यांच्यावर नोटा उडवित होते. पोलिसांनी ग्राहकांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून जवळपास एक लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, बारमधील नजारा.