आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यात 1.11 काेटींची बेहिशेबी राेकड जप्त, बांधकाम व्यावसायिक अंकेश अगरवाल ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर बेहिशेबी मालमत्ता व संपत्ती बाळगणाऱ्यांचे बिंग हळूहळू फुटत चालले आहे. पुण्यात १ काेटी ११ लाख ४६ हजार रुपयांची राेकड बदलून नवीन नोटा घेण्यासाठी आलेल्या अंकेश अगरवाल या बांधकाम व्यावसायिकाला दराेडा प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. शिवाजीनगरमध्ये ही कारवाई केली.

अगरवाल पुणे महापालिकेच्या इमारतीसमाेर मंगला सिनेमागृहाच्या पाठीमागे नाेटा बदलून घेण्यासाठी येणार असल्याची माहिती गुप्तचरांमार्फत मिळाली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

नोटाच नोटा !
अगरवाल याच्याकडे जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांची बंडले आढळली. ही रक्कम १ काेटी ११ लाख ४६ हजार रुपये आहे. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी माहिती दिली असून अगरवाल व रक्कम आता प्राप्तिकर विभागाकडे सोपवण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...