आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पश्चिम महाराष्ट्रात घरफोडी करणारे तिघे गजाआड

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, नगर या जिल्ह्यांत घरफोडी, वाहनचोरी करणारा सराईत गुन्हेगार राजू जावळकर (वय 43, रा. पुणे), सोमनाथ चौधरी (वय 24, रा. फुरसुंगी, पुणे) व रमेश कुंभार (वय 32, रा. कोल्हापूर) यांना पोलिसांनी सापळा रचून नगर येथे अटक केली. त्यांच्याकडून एकूण 12 गुन्हे उघडकीस आले असून 40 लाख आठ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
वाहनचोरी प्रतिबंधक पथकाचे पोलिस निरीक्षक कमलाकर ताकवले यांच्या पथकाने ही कारवाई केली. नगर येथे आरोपी येणार असल्याची माहिती ताकवले यांना खबºयामार्फत मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी त्यांना अटक केली. या तीन आरोपींनी हडपसर येथे आठ लाख रुपयांची घरफोडी तसेच विविध जिल्ह्यांतील ठिकाणाहून ट्रॅक्टर व चारचाकी वाहने चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींकडून चार ट्रॅक्टर ट्रॉलीसह, एक स्कॉर्पिओ, एक एस्टीम, एक बोलेरो, एक मारुती वॅगन आर व 443 ग्रॅम सोने तसेच टीव्ही, लॅपटॉप, कॅमेरा, गॅस सिलिंडर व शेगडी असा
सर्व मिळून 40 लाख आठ हजार शंभर रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. घरफोडीतील चोरीचे सोने विकत घेणारा सराफ जयंत जाधव (वय 32, रा.घाटकोपर) यासही अटक करण्यात आली.