आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune Sees 317% Jump In Number Of Super Rich In 2004 14 For The Decade Ended

REPORT: भारतात अतिश्रीमंतांच्या संख्येत वाढ, पुण्यात सर्वाधिक वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- अति श्रीमंतांच्या संख्येत वाढ झालेल्यांत आशिया-प्रशांत भागातील 20 प्रमुख शहरांत मुंबई- दिल्लीसह सात भारतीय शहरांचा समावेश आहे. न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालानुसार डिसेंबर 2014 अखेर संपलेल्या दशकातील आशिया-प्रशांत भागातील 20 शहरांची यादी जारी केली आहे. यात पुणे, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, कोलकाता, दिल्ली मुंबई या शहरांचा समावेश आहे. या यादीत व्हिएतनाममधील हो ची मिन शहर पहिल्या स्थानी आहे.

या अहवालात ज्यांची संपत्ती 10 लाख डॉलर (6.25 कोटी रुपये) किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा व्यक्तींना अतिश्रीमंत (सुपर रिच- एचएनडब्ल्यूआय) मानण्यात आले आहे. मल्टी मिलेनिअर श्रेणीत ज्यांची संपत्ती किमान एक कोटी डॉलर (62.50 कोटी रुपये) मानण्यात आली आहे.
भारत 8 व्या स्थानी-
जगात 1.3 कोटींपेक्षा जास्त अब्जाधीश आहेत. सुमारे 4.95 लाख लोक मल्टी मिलेनिअर या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. भारताला 14,800 मल्टी-मिलेनिअरसह यादीत 8 वे स्थान देण्यात आले आहे.
सर्वाधिक वाढ पुण्यात-
पुण्यात डिसेंबर 2004 मध्ये अतिश्रीमंतांची संख्या 60 इतकी होती. ती वाढून डिसेंबर 2014 मध्ये 250 झाली आहे. हे वाढीचे प्रमाण 317 टक्के आहे. मुंबईत अब्जाधीशांची (मल्टी मिलेनिअर) गतीने वाढ झाली आहे. डिसेंबर 2014 मध्ये मुंबईतील अब्जाधीशांची संख्या 2690 पर्यंत पोहोचली आहे.

भारतातील प्रमुख शहरांतील मल्टी मिलेनिअरचा आलेख ( डिसेंबर 2004 ते डिसेंबर 2014)
हैदराबाद- 160 (2004)- 510 (2004)

बंगळुरू- 140 (2004)- 440 (2014)
दिल्ली- 430 (2004)- 1350 (2014)
चेन्नई- 130 ( 2004)- 390 (2014)
कोलकाता- 210 (2004)- 570 (2014)