आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल भरणाऱ्यांनो सावधान; या शहरातील पंपावर पेट्रोल ऐवजी निघाले पाणी, नागरिक संतप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉटलमध्ये पेट्रोल आणि पाणी दाखवताना एक ग्राहक... - Divya Marathi
बॉटलमध्ये पेट्रोल आणि पाणी दाखवताना एक ग्राहक...
पुणे - राज्यात पेट्रोल चोरीच्या घटना घडत असतानाच शिरूर शहरातील भारत पेट्रोलियम या कंपनीच्या पेट्रोल पंपामधून पेट्रोल येण्या ऐवजी चक्क पाणीच येत होते. त्यामुळे पेट्रोल या पंपावरून पेट्रोल भरून निघालेल्यांची मोठी तारांबळ उडाली. आपल्या गाडीत पेट्रोल असल्याचे समजून काही अंतरावर जाणाऱ्या लोकांच्या गाड्या बंद पडल्या. यानंतर टाकीत भरलेले पेट्रोल नाही तर पाणीच असल्याचे त्या सर्वांच्या निदर्शनात आले. 
 
अपघात झाला असता...
या पंपावरून टँक फुल करून निघालेल्या एका व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे, तो एका कामानिमित्त कोर्टात गेला होता. तेथून परताना अचानक मुख्य रस्त्यावर त्याची गाडी बंद पडली आणि समोर ट्रक उभा होता. अपघातात थोडक्यात बचावलो असे संबंधिताने सांगितले आहे. गाडी नवीन असल्याने आपण शोरूममध्ये जाऊन भांडलो. तेव्हा गॅरेजवाल्यांनी वाहनाच्या टाकीतून चक्क निम्मेहून अधिक पाणी आणि थोडेसे पेट्रोल काढून दाखवले.
 
 
 
पेट्रोलचे नमुणे घेतले
या प्रकरणी संतप्त नागरिकांनी शिरूर तहसिलदारांकडे तक्रार केली. त्यावर वेळीच तहसीलदार रणजीत भोसले यांनी वरिष्ठ पेट्रोलियम अधिकाऱ्यांनी ही बाब कळवली. यानंतर संबंधित पेट्रोल पंपावर धाड टाकून पेट्रोलचे नमुणे प्रयोगशाळेत तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच पेट्रोल पंपावरील व्यवहार पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. 
बातम्या आणखी आहेत...