आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात बेछुट गोळीबार, धारदार शस्त्राने माजी सरपंचाचा खून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - सिंहगड रोडवरील वडगाव धायरी येथे दिवसा ढवळ्या बेछुट गोळीबार आणि कोयत्याने वार करून एका व्यक्तिची हत्या करण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

अर्जुन घुले असे या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तिचे नाव आहे. वडगाव धायरीजवळ असलेल्या नांदोशी गावचे ते माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

या घटनेमुळे वडगाव धायरी परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. हत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जमिनीच्या वादातून हत्या झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेची दत्तवाडी पोलिस कसून चौकशी करत आहेत.