आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune: Students Clash Over Change Of WhatsApp Group Name; 1 Hospitalised

व्हॉट्सअॅप मेसेजवरून विद्यार्थ्याला बेदम मारहाण, पुण्‍यातील प्रकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेज टाकल्याच्या रागातून पुण्यातील गरवारे महाविद्यालयात बीबीएच्या एका विद्यार्थ्याला २५ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली.

या मारहाणीत अक्षय गणेश दिनकर (२१, रा. सिंहगड राेड, पुणे) हा जखमी झाला अाहे. याप्रकरणी अनिरुद्ध भालेराव, हर्षद किसनराव चाैगुले, राेहन पेटकर, शुभम गांगुर्डे व सुमीत बाटुंगे यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी संकेत साळुंके यानेे िफर्याद िदली अाहे.

संकेत हा गरवारे महाविद्यालयात बीबीएचे शिक्षण घेत असून त्यांच्या वर्गातील मुलांचा व्हाॅट्सअॅप ग्रुप अाहे. संकेत याचा गुरुवारी वाढदिवस हाेता. त्या दिवशी व्हाॅट्सअॅपवर त्याला मित्र शुभेच्छा देत हाेते. त्या वेळी त्याचा मित्र हर्षद चाैगुले याने सदर ग्रुपचे नाव बदलले हाेते. तेव्हा अक्षयने याबाबत त्याला विचारणा केली. त्यावर हर्षदने त्याला "तू काेण मला विचारणार?' असे उत्तर दिले. दुसऱ्या दिवशी हा वाद िमटला हाेता. मात्र, २२ एप्रिल राेजी महाविद्यालयात परीक्षा देऊन पार्किंगमध्ये संकेत व अक्षय बाेलत उभे असताना हर्षद तिथे आला. त्याने वाद घालायला सुरुवात करून अक्षयला बेदम मारहाण केली. या वेळी संकेत मध्ये पडला असता त्यालाही मारहाण करण्यात अाली.