आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्याहून सुरतला जाणारी खासगी बस 30 फुट पुलावरुन खाली कोसळली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवसारी (गुजरात)- पुणे येथून सुरतला जात असलेली खासगी ट्रॅव्हल कंपनीची बस दोलधरा खाडी पुलावरुन तब्बल 30 फुट खाली कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणाचाही मृत्यू झाला नाही. या बसमधील 17 प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व प्रवाशांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस पाण्यात न कोसळल्याने जीवित हाणी टळल्याचे सांगितले जात आहे. बस कोसळली त्या ठिकाणी खडक होता. बस कोसळल्यानंतर प्रवाशांनी जोरदार आवाज केला. त्यानंतर जवळ असलेल्या एका गावातील लोक मदतीसाठी धावून आले. त्यांनी प्रवाशांना बसबाहेर काढले. त्यांना रुग्णालयात दाखल केले. या बसमध्ये मुंबई, पुणे, सुरत, बडोद्याचे प्रवासी होते. चालकाच्या चुकीमुळे बस पुलावरुन खाली कोसळल्याचे सांगण्यात आले आहे.
पुढील स्लाईडवर बघा.... पुण्याहून सुरतला जाणारी बस अशी कोसळली पुलाखाली.....
बातम्या आणखी आहेत...