आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहवाल: श्रीमंत लोकांच्या टक्केवारी वाढीत पुणे अव्वल, देशात तिसरा क्रमांक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रतिकात्मक छायाचित्र)
पुणे- देशभरातील अति धनाढ्य म्हणजेच श्रीमंत लोकांच्या आकडेवारीत भरमसाठ वाढ झाल्याचे समोर आले आहे. न्यू वर्ल्ड वेल्थच्या ताज्या अहवालात याबाबतचा खुलासा करण्यात आला आहे. अहवालानुसार आशिया-प्रशांत खंडातील 20 प्रमुख शहरात 7 भारतीय शहरांचा समावेश आहे. यात पुणे, मुंबई व दिल्लीचा समावेश आहे. तसेच पुण्यात सर्वाधिक श्रीमंत लोक राहत असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.
अहवालाच्या माहितीनुसार, आशिया- प्रशांत खंडातील मागील दशकभरातील 20 शहरांपैकी भारतातील पुणे, हैदराबाद, बेंगळुरु, चेन्नई, कोलकाता, दिल्ली व मुंबई शहरांचा समावेश आहे. याच यादीत व्हियतनाममधील मिंच शहरातील पहिले स्थान मिळाले आहे.
सर्वाधिक वाढ पुण्यात-
भारतीय शहरांत पुण्याला पहिले स्थान मिळाले आहे. न्यू वर्ल्ड वेल्थचा अहवाल सांगतो की, पुणे शहरात डिसेंबर 2004 साली सुपर रिच व्यक्तींची संख्या 60 होती जी डिसेंबर 2014 मध्ये 250 इतकी झाली आहे. म्हणजेच यात 317 टक्के इतकी वाढ झाली आहे. या टक्केवारीनुसार पुणे पहिल्या स्थानावर आहे. तर डिसेंबर 2014 पर्यंत मुंबईत 2,690 मल्टी मिलियनेर व्यक्ती असल्याचे म्हटले आहे.
अहवालात सुपर रिच अशा व्यक्तींना मानले गेले आहे ज्यांची संपत्ती 100 लाख डॉलर (भारतीय चलनानुसार 625 कोटी रूपये) पेक्षा अधिक आहे. तर, मल्टी मिलियनेयर श्रेणीत कमीत कमी एक 10 लाख डॉलर संपत्ती (62 कोटी) रूपये इतकी मानली गेली आहे.
भारत आठव्या क्रमांकावर-

जगभरात 1.3 कोटीपेक्षा अधिक मिलियनेयर आहेत. तर जवळपास 4.95 लाख लोग मल्टी-मिलियनेयर श्रेणीत मोडतात. भारतात 14, 800 मल्टी-मिलियनेयर आहेत व जगात भारत 8 व्या स्थानी आहे.
अमेरिका अव्वल, शहरात हाँगकाँग प्रथम-
1 लाख 83 हजार 500 सुपर-रिच व्यक्तींसह जगभरात अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर 26 हजार 600 सुपर रिच लोक चीनमध्ये आहेत तर जर्मनीत 25 हजार 400 लोक सुपर रिच आहेत. चीन दुस-या तर जर्मनी तिस-या स्थानावर आहे. एक दशकात जगभरात मल्टी-मिलियनेयरांची संख्येत 71 टक्के वाढ झाली आहे. हाँगकाँग या शहरात जगातील सर्वाधिक मल्टी-मिलियनेयर राहतात तर त्यानंतर न्यूयॉर्क आणि लंडन यांचा क्रमांक लागतो.
भारतात कोणत्या शहरात किती राहतात मल्टी मिलियनेयर ( तुलना 2004 आणि 2014 शी)
हैदराबाद- 160 (2004) - 510 ( 2014)
बेंगळुरू- 140 (2004) - 440 ( 2014)
दिल्ली- 430 (2004) - 1,350 (2014)
चेन्नई- 130 (2004) - 390 (2014)
कोलकाता- 210 ( 2004) - 570 (2014)