आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात धावत्या गाडीत सहकारी महिलेला मारहाण करत बाहेर फेकण्याचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यात धावत्या गाडीतून सहकारी महिलेला मारहाण करुन बाहेर फेकण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मगरपट्टा भागात एका आयटी कंपनीत काम करणारी महिला आणि तिचा सहकारी यांच्यात झालेल्या वादातून हा प्रकार घडला आहे.

पुण्यातील मगरपट्टा येथे एका आयटी कंपनीत काम करणारी महिला आणि तिचा 25 वर्षीय सहकारी झुबेर यांच्यात पूर्वी प्रेमसंबंध होते. रात्रीची शिफ्ट संपवून सकाळी 4 वाजेच्या दरम्यान घरी परतत असतांना त्याच्यात वाद झाला. दोघांमधील वाद विकोपाला जाऊन झुबेरने महिलेला धावत्या गाडीत जबर मारहाण केली. इतकेच नााही तर, त्याने तिला बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला. गाडी चालकाला दोघांमधील वाद लक्षात येताच त्याने गाडी थांबवली. चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला.
 
या घटनेनंतर पीडितेने झुबेरच्या विरोधात खडकी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या प्रकरणी झुबेरला अटक केली आहे. त्याला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...