पुणे - दोन चोरांनी घरफोडी करून मिळवलेल्या रकमेतून वडगाव शेरीत ‘श्री कलेक्शन’ या नावाने कपड्यांचे दुकान थाटले. पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांचा हा ‘उद्योग-प्रताप’ उघडकीस आला. त्यांच्याकडून सोन्याचे ६८.७ तोळ्यांचे तर चांदीचे एक किलोचे दागिने जप्त करण्यात आले. त्यांची किंमत १५ लाख ४८ हजार रुपये आहे.
गजराज माेतीलाल वर्मा (वय ३१, रा. वडगाव शेरी, मूळ मध्य प्रदेश) दीपककुमार ऊर्फ धाेनी नथुराम बेहरा (२६,रा. वडगाव शेरी, मूळ अाेडिशा) अशी या दोन चोरांची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार फरार आहे. पुणे ग्रामीणचे पाेलीस अधीक्षक मनाेजकुमार लाेहिया यांनी सांगितले की, दोन वेगवेगळ्या पथकांनी गजराज दीपककुमारला अटक केली. त्यांनी २०१४ २०१५ मध्ये हवेली पाेलिस ठाणे परिसरात सात घरफाेड्या केल्या होत्या.
शिक्षा भाेगूनही पुन्हा घरफाेडी
गजराजवर्मावर जिल्ह्यात घरफोडीचे पाच गुन्हे दाखल आहेत. वानवडी पाेलीस ठाण्यात नोंद असलेल्या एका गुन्ह्यात त्याला दीड वर्षाची शिक्षा झाली होती. ती शिक्षा भोगून तो बाहेर आला पुन्हा घरफोडी केली. त्यातील पैशातून त्याने दाेन महिन्यांपूर्वी वडगाव शेरी येथे ‘श्री कलेक्शन’ हे कापड दुकान सुरू केले.