आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुलगुरूंचा बायाेडाटा पुणे विद्यापीठाकडे नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. वासुदेव गाडे यांच्या बायाेडाटा, त्यांनी अांतरराष्ट्रीय, राष्ट्रीय शाेधपत्रिका मधून प्रसिद्ध केलेले शाेधनिबंध, पेटंट, पुस्तके याबाबत माहिती विद्यापीठाकडेच नसल्याची बाब माहिती अधिकार कायद्यात उघड झाली आहे. माजी सिनेट सदस्य डाॅ.अतुल बागुल यांनी माहिती मागवली होती. दरम्यान, विद्यापीठाच्या उत्तरावर अाश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
डाॅ. बागुल म्हणाले, कुलगुरूंचा बायाेडाटा मिळवण्यासाठी डाॅ. गाडे यांच्याकडे पत्र लिहून मागणी केली हाेती. मात्र, दीड महिन्यानंतरही मला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हीच माहिती मिळविण्यासाठी अारटीअाय अर्ज केला. कुलगुरू बायाेडाटा देत नाहीत, विद्यापीठाकडे ताे उपलब्ध नाही, हा सर्व प्रकार धक्कादायक अाहे. डाॅ.गाडे अनेक वर्षे विद्यापीठात प्राध्यापक अाहेत तसेच बीसीयूडीचे संचालक अाणि बायाेटेक्नाॅलाॅजीचे विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले अाहे. गेल्या साडेचार वर्षांपासून ते कुलगुरू असून त्यांची माहिती विद्यापीठाकडे नसणे ही लाजिरवाणी गाेष्ट अाहे. कुलगुरू व सर्व प्राध्यापकांची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर असणे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...