आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे विद्यापीठ घोटाळा सात जणांना जामीन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुनर्मूल्यांकनामध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे गुण वाढवून त्यांना उत्तीर्ण करून पुणे विद्यापीठाची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सात आरोपींना प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यशश्री मारुलकर यांच्या न्यायालयाने शनिवारी सशर्त जामीन मंजूर केला.
राजेंद्र मनोहर पंडित, लालसिंग शंकर वसावे, सुरेंद्र रामदास नायडू, नंदा भीमराव पवार, अलआमरी सामी हामुद, ओबेद अहमद रहमान अवध आणि मोहसीन मेहबूब शेख अशी जामीन मिळलेल्या आरोपींची नावे आहेत. या घोटाळाप्रकरणी विद्यापीठातील कनिष्ठ सहायक रमेश किसन शेलार, अशोक शंकर रानवडे व चेतन गजानन परभणे यांना यापूर्वीच न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.