पुणे - विद्यापीठाचा ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्याचा निर्णय सोमवारी ( ता.सात) मंत्रिमंडळाने घेतला.सावित्रीबाई यांच्या विचारांचा आदर्श भावी पिढीसमोर ठेवण्यासाठी विद्यापीठ नामकरणाची मागणी जोर धरत होती. कोणतेही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून हा शासनाने निर्णय घेतला आहे.
मराठवाडा विद्यापीठाचे ' डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामविस्तारासाठी शासनाशी संघर्ष करावा लागला होता. हा इतिहास ध्यानात घेऊन पुणे विद्यापीठाचे नामविस्तार घेण्यात आले आहे, असे बोलले जाते. मराठा आरक्षण आणि आता पुणे विद्यापीठाचे नामविस्तार यामागे राज्यकर्त्यांचा निवडणुकीत राजकीय फायदा मिळवण्याचा उद्देश आहे.