आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune Violence: Nikhil Tikone Was Attacked Had To Prove His Identity

पुणे : मुस्लिमांनी आरएसएसचा समजून मारले तर हिंदुंनी ठरवले \'निखिल खान\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - सोशल नेटवर्किंग साइट्स वर छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह कंटेंट शेअर केल्यामुळे झालेल्या मोहसीन शेख याच्या हत्येप्रकरणी हिंदू राष्‍ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाईला अटक झाली आहे. त्यांच्यासह या प्रकरणी आतापर्यंत 20 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे, हिंसेचा बळी ठरलेला आणखी एक तरुण पीडित निखिल तिकोनेच्या वेदनाही असह्य म्हणाव्या अशाच आहेत. कसबा पेठेत राहणा-या निखिलवर मुस्लीम समुदायाच्या काही लोकांनी 31 मे रोजी हल्ला केला होता. तसेच या प्रकरणानंतर त्याला काही हिंदु समुदायांकडूनही धमक्या मिळाल्या होत्या.

दोन्ही समुदायांच्या रागाचा फटका
तिकोने यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्याचा फोटो सगळ्यांमध्येच चर्चेचा विषय बनला होता. इंटरनेट आणि व्हॉट्स अप वर निखिलला निखिल खान म्हणून संबोधले जाऊ लागले. तसेच त्यानेच शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भात आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला असा प्रचारही सोशल साईट्सवर सुरू झाला. पण तिकोनेबाबत जेव्हा हा अपप्रचार सुरू होता, त्यावेळी तो रुग्णालयात उपचार घेत होता. निखिल अजूनही लोकांना हे समजावण्याचा प्रयत्न करत आहे की, तहा मजकूर त्याने शेअर केलेला नव्हता. कसबा पेठेमध्ये जेव्हा काही हिंदु समुदायाचे लोक आक्षेपार्ह मजकुराबाबत विरोध करत होते, त्यावेळी या परिसरात मुस्लीमांच्या एका समुदायाने रात्री दहाच्या सुमारास निखिल आणि त्याच्या मित्राला पकडले होते. ते दोघे एका लग्नाहून परतत होते.
टिळा पाहून भडकले
हा प्रकार सांगताना निखिल सांगतो की, सुमारे 50 च्या सुमारास मुस्लीमांचा एक समुदाय त्याठिकाणी होता. त्यांच्या हातामध्ये तलवारी आणि लोखंडी सळया होत्या. आम्ही लग्नावरुन परतत होतो. त्यामुळे आमच्या डोक्यावर टिळा लावलेला होता. त्या गर्दीने आमच्या कपाळावर तो टिळा पाहिला व विचारले की, तुम्ही आरएसएसचे आहात का? त्यानंतर आम्हाला काही समजण्याआधीच त्यांनी आमच्यावर हल्ला केला. आमची गाडी त्यांनी पूर्णपणे फोडून टाकली. आम्ही त्याठिकाणाहून कसाबसा पळ काढला. माझ्या डोक्यावर आणि पाठीवर मार लागला होता. त्यानंतर आम्ही रुग्णालयात गेलो आणि पोलिसांत तक्रार केली.

निखिल म्हणाला, व्हॉट्स अपद्वारे सांगितले मी मुस्लीम नाही
कोणीतरी व्हाट्स अपवर माझा फोटो व्हायरल केला आणि माझे नाव निखिल असून आक्षेपार्ह कंटेंट प्रकरणी मला अटक करण्यात आल्याचे वृत्तही पसरवले जात होते. हे समजताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. ज्यांनी कोणी हे मॅसेज वाचले त्यांनी मला फाशी दिली जावी अशाच प्रतिक्रिया दिल्या. पण यातून बाहेर येण्यासाठी मी माझ्या मित्रांच्या मदतीने माझा एक व्हिडिओ अपलोड केला आणि या संपूर्ण प्रकरणाशी काहीह संबंध नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला.

फोटो : हिंसेला बळी पडलेला निखिल तिकोनेचा फाईल फोटो