आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताेंडावर अॅसिड फेकण्याची पुण्यातील नगरसेविकेला धमकी, प्रेमसंबंध ठेवण्यासाठी बळजबरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्मक फोटो - Divya Marathi
प्रतिकात्मक फोटो
पुणे - पुण्यातील खडकी कॅन्टोन्मेंट परिसरातील भाजपच्या नगरसेविकेला तिच्याच वाॅर्डात राहणाऱ्या एका तरुणाने प्रेमसंबंध ठेवण्यासाठी शिवीगाळ करत बळजबरी केली. तसेच प्रेमसंबंध नाकारल्यास ताेंडावर अॅसिड फेकून चेहरा विद्रूप करण्याची धमकी दिली आहे.
 
याप्रकरणी नगरसेविकेने तक्रार दिल्यानंतर पाेलिसांनी विनायक विलास चिव्हे (२९, रा. रेंजहिल्स, खडकी, पुणे) याला अटक केली अाहे.  विनायक हा सामाजिक कार्यकर्ता म्हणून खडकी परिसरात वावरतो. काही दिवसांपूर्वी त्याने नगरसेविकेचा हात पकडून जबरदस्ती केली. तसेच ‘तू माझ्याबराेबर प्रेमसंबंध ठेव’ नाहीतर तुझ्या तोंडावर अॅसिड फेकून चेहरा विद्रूप करेल, अशी धमकी दिली. त्यामुळे नगरसेविकेने विनायकविरोधात पोलिसांत तक्रार दिली.  
 
हे पण वाचा..
 
बातम्या आणखी आहेत...