आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune\'s Congress ncp Canditate File A Nomination Form At Collector Office

PHOTO: काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे पुण्यात जोरदार शक्तीप्रदर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पुणे जिल्ह्यातील चारही उमेदवारांनी आज जोरदार शक्तीप्रदर्शन करीत अर्ज दाखल केले. पुण्यातून डॉ. विश्वजित कदम, बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून देवदत्त निकम तसेच मावळमधून राहुल नार्वेकर यांनी अर्ज दाखल केले. यानंतर या चौघांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार, अजित पवार, हर्षवर्धन पाटील, पंतगराव कदम, दिलीप वळसे पाटील, भास्करराव जाधव यांच्यासह अनेकांनी हजेरी लावली. यावेळी मोठी बडदास्त ठेवण्यात आली होती.
अर्ज भरल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या, बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याकरीता राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि पीपल्स रीपब्लिकन पार्टीची अधिकृत उमेदवार म्हणून मी आज अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे भरला. भारताची प्रगती आणि महाराष्ट्राचा विकास या दोन्ही बाबतीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकॉंग्रेस पार्टी आणि समाजातील वंचित घटकांची बाजू जोरदारपणे मांडणाऱ्या रिपब्लिकन पक्षाची उमेदवार म्हणून ही लोकसभेची निवडणूक मी लढवित आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेने विक्रमी बहुमताने मला 2009 साली विजयी केले होते. गेल्या पाच वर्षांत मतदार संघात केलेल्या विकासकामांची शिदोरी घेऊनच मी या निवडणूकीमध्ये उमेदवार म्हणून आज अर्ज भरला आहे. या निवडणूकीमध्ये देखील जनता मला साथ देईल याबद्दल मला विश्वास आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करा व या सभेची छायाचित्रे पाहा...