आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune's FTII With Other Three Institute Hand Over To Human Resource Ministry

पुण्याच्या ‘एफटीआय’सह तीन संस्था होणार मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे वर्ग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) या संस्थेसह देशातील तीन संस्था लवकरच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे वर्ग करण्यात येणार आहेत, असा खुलासा केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने निवेदनाद्वारे केला आहे. यापैकी कुठल्याही संस्थेच्या खासगीकरणाचा विचार नाही, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

एफटीआयआयचे खासगीकरण हाेणार असल्याचे वृत्त सध्या चर्चेत आहे. त्याचे खंडन करताना मंत्रालयाने म्हटले की, ‘पुण्यातली एफटीआयआय, कोलकाता येथील सत्यजित रे फिल्म अंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आणि दिल्ली येथील आयआयएमसी या तिन्ही संस्था लवकरच मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे वर्ग करण्यात येणार आहेत. पाच वर्षांत ही प्रक्रिया पूर्ण होईल. त्यासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तसेच संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.’

एफटीआयआयला ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे संस्था अनेक बदलांच्या स्थितीत आहे. नियामिक मंडळावरील नियुक्त्या त्याच संदर्भात आहेत. प्रशासकीय तसेच अभ्यासक्रमाचे निर्णय ठरवण्यासाठी त्या आहेत. या नियुक्त्यांविषयी मागण्या करण्याचा विद्यार्थ्यांना अधिकारच नाही, अशी मंत्रालयाची भूमिका आहे. त्यामुळे एफटीआयआयच्या शिष्टमंडळाशी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलेल्या चर्चेत नियामक मंडळावरील नियुक्त्यांचा मुद्दाच नव्हता, हे स्पष्ट झाले आहे.
शासन संस्थेच्या प्रत्येक विद्यार्थ्यांमागे १० लाख रुपये खर्च करते. तरीही संस्थेतील २००८ मधली बॅच अद्याप पास आऊट झालेली नाही, याचा उल्लेख चर्चेत झाल्याचे सूत्रांनी सांगितले. देशातील एका संस्थेतील प्रत्येक विद्यार्थ्यांमागे लक्षावधी रुपये खर्च पेलत असताना, लक्षावधी मुलांच्या प्राथमिक शिक्षणाचा व आरोग्याचा प्रश्नही तितकाच महत्वाचा असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.