आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 वर्षाच्या वैशालीचे मोदींना पत्र, 15 दिवसात झाले मोफत हार्ट ऑपरेशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
6 वर्षाच्या वैशालीच्या ह्दयात छिद्र असल्याचे दोन वर्षापूर्वी समोर आले होेते. - Divya Marathi
6 वर्षाच्या वैशालीच्या ह्दयात छिद्र असल्याचे दोन वर्षापूर्वी समोर आले होेते.
पुणे- पुण्यातील हडपसर भागात राहणा-या 6 वर्षाच्या वैशालीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहले अन् अवघ्या 15 दिवसात तिच्या हार्टचे मोफत ऑपरेशनही झाले. जन्मजात असलेल्या हदयरोगावर उपचार करण्यासाठी तिच्या आई-वडिलांकडे पैसे नव्हते. तिला इतर सामाजिक संस्था अथवा राजकीय नेत्यांकडून आर्थिक मदतही मिळत नव्हती. अखेर तिने आपल्या आजाराची कैफियत मांडणारे पत्र थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच लिहले. विशेष म्हणजे अवघ्या 15 दिवसात यावर कार्यवाही करीत पीएमओने पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांना आदेश देत या मुलीचे ऑपरेशन करण्याचे आदेश दिले. अखेर वैशालीवर यशस्वी ऑपरेशन झाले व तिला जीवदान मिळाले.
वैशाली मोहनीश यादव (रा. हडपसर) असे या 6 वर्षीय बालिकेचे नाव आहे. तिचे वडील मूळचे नगर जिल्ह्यात आहेत. मात्र, उदरनिर्वाहासाठी ते पुण्यातील हडपसर भागात राहतात. तिचे वडील पेटिंगचे काम करतीत. वैशाली लहान असतानाच तिची आई तिला सोडून गेली. आता ती आपल्या वडिलांसमवेत राहते. दोन वर्षापूर्वी शाळेत असताना वैशाली अचानक बेशुद्ध झाली. त्यावेळी डॉक्टरांनी तिच्या ह्दयात एक छिद्र असल्याचे सांगितले. तसेच त्यासाठी ऑपरेशन करण्याची गरज असल्याचे सांगितले.
मात्र, रोजचे रोजंदारीचे काम असल्याने वैशालीचे वडिल तिच्या ऑपरेशनसाठी पैसे एकत्र करू शकत नव्हते.
राजकीय नेत्यांची, सामाजिक संस्थांची नाही मिळाली मदत-
- वैशालीच्या हद्यात छिद्र असल्याचे समजल्यानंतर तिच्या उपचारासाठी तिच्या वडिलांनी आणि काकांनी काही सामाजिक संस्थांकडे व राजकीय पक्षांकडे मदत मागितली. मात्र, कोठूनच त्यांना मदत मिळाली नाही.
- वडिल व काकांच्या प्रयत्नानंतरही आपल्या ऑपरेशनसाठी पैसे मिळत नसल्याने वैशाली निराश होती.
- अशातच एक दिवस टीव्हीवर बेटी बचाओ बेटी पढाओ ही जाहिरात तिने पाहिली व वडिलांना मोदींना पत्र लिहण्याची विनंती केली.
- मात्र तिच्या काकांनी वैशालीला तुझ्याच हस्ताक्षरात मोदींना पत्र लिहण्यास सांगितले.
- तिने मोडक्या तोडक्या हस्तक्षरात हिंदीतून मोदींना पत्र लिहले.
असे झाले वैशालीचे ऑपरेशन?
- 20 मे रोजी वैशालीने पंतप्रधान मोदींना पत्र लिहले. यासोबतच तिने आपल्या शाळेचे नाव आणि मोबाईल क्रमांक पाठवला.
- 27 मे रोजी पीएमओने हे पत्र पाहून पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांना वैशालीवर उपचार करण्याचे आदेश दिले.
- यानंतर जिल्हा प्रशासनाचे अधिकारी वैशालीच्या घरी गेले मात्र घरी कोणीच आढळले नाही. नंतर शाळेमार्फत संपर्क झाला.
- त्यानंतर औंध येथील शासकीय रूग्णालयात वैशालीची तपासणी करण्यात आली.
- 4 जून रोजी तिच्यावर रूबी रूग्णालयात यशस्वी ऑपरेशन झाले.
- मंगळवारी म्हणजेच 7 जून रोजी तिला डिस्चार्ज मिळाला.
- वैशालीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व डॉक्टरांचे आभार मानले आहेत.
- वैशाली लवकरच पुन्हा एकदा मोदींना आभाराचे पत्र लिहणार आहे.
पुढे पाहा, वैशालीचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...