आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्याच्या मंडई गणपतीचे ४३ लाखांचे दागिने लंपास, आरोपी सीसीटीव्हीत कैद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुण्यातील मंडईतील प्रसिद्ध शारदा गणेश गणपतीच्या अंगावरील ४३ लाख ४८ हजार रुपयांचे साेन्याचे दागिने अज्ञात चाेरट्याने लंपास केल्याची घटना बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, मंदिरातील सीसीटीव्हीत आरोपीचे रेकाॅर्डिंग झाले असून पोलिस त्याआधारे तपास करत आहेत.

वरिष्ठ पाेलिस निरीक्षक हेमंत भट म्हणाले, शारदा गणपती मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळील खिडकीची काच अाराेपीने फाेडली. त्यानंतर त्याने मंदिरात प्रवेश करून मूर्तीवरील साेन्याच्या चेन, गंठण, हि-याचा नेकलेस असा ४३ लाख ४८ हजार रुपयांचा एेवज पळवला. आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याच्या अाधारे पाेलिस तपास करत अाहेत. विश्रामबाग पाेलिस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविराेधात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. दरम्यान, गणपती मंडळाच्या पदाधिका-यांनी सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावरही अपलोड करत आरोपींची माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
बातम्या आणखी आहेत...