आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूकंपग्रस्त नेपाळवासीयांसाठी भूकंपरोधक घरकुले, १२० कुटुंबीयांना देणार निवास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - नेपाळमधील विनाशकारी भूकंपात हजारो लोक बेघर झाले. अशांसाठी माइर्स एमआयटीच्या वतीने काठमांडूजवळ विश्वशांतीनगर वसवण्यात येणार आहे. घरादाराला पारखे झालेल्या १२० कुटुंबीयांना ही घरे दिली जाणार आहेत.

माइर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांनी येथे पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. माइर्सचे शिष्टमंडळ या कामासाठी नुकतेच नेपाळ येथे गेले होते.

पंतप्रधान सुशील कोईराला आणि अध्यक्ष राम बरन यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली. त्यानुसार माइर्सतर्फे काठमांडूजवळच्या श्री तारकेश्वर नगरपालिकेच्या हद्दीत माइर्सतर्फे १२० घरकुले उभारण्यात येणार आहेत, असे डॉ. कराड म्हणाले.

घरकुलांचे वेगळेपण
स्थान : काठमांडूजवळची तारकेश्वर नगरपालिका
घरांची एकूण संख्या १२०
घरकुलांचे नामकरण – विश्वशांतीनगर
६० घरांना संत ज्ञानेश्वर, ६० घरांना संत तुकाराम असे नाव
एका घरासाठी येणारा खर्च सुमारे ९० हजार
निधी एमआयटी देणार { घरे भूकंपरोधक स्वरूपाची त्यामुळे मोठ्या भूकंपातही टिकाऊ
प्रत्येक घराला दोन खोल्या, टॉयलेट ब्लॉक, पाणीपुरवठ्याची स्वतंत्र व्यवस्था
हवा खेळती राहण्यासाठी कलात्मक खिडक्या आणि छपरावर झरोके
तीन महिन्यांतघरे पूर्ण करू
घरांसोबत आम्ही नेपाळ प्रशासनाच्या मान्यतेने भूकंपामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या शिक्षणासाठी विश्वशांती गुरुकुल नावाची निवासी शाळा उभारण्याचा प्रस्तावही दिला आहे. सर्व घरे येत्या तीन महिन्यांत पूर्ण केली जातील. - डॉ. विश्वनाथ कराड – संस्थापक - अध्यक्ष एमआयटी माइर्स
बातम्या आणखी आहेत...