आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

18 हजार फूट दरीत पडलेल्या गिर्याराेहकाची मृत्यूशी झुंज, लेहमध्ये तीन दिवसांपूर्वी अपघात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - लेह येथे गिर्याराेहण करत असताना १८ हजार फूट खाेल दरीत पडलेला पुण्यातील वारजे येथील गिर्याराेहक पद्मेश पाटील (३२) गंभीर जखमी झाला असून त्याला वाचवण्यासाठी कुटुंबीय, नातेवाइकांसाेबतच राजकीय नेते, केंद्र व राज्य सरकारने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याला उपचारासाठी एअर अॅम्ब्युलन्सने चंदिगडला हलवण्यात अाले अाहे.   
 
पद्मेश ९ अाॅगस्ट राेजी मित्रांसाेबत गिर्याराेहण करण्यासाठी लेहमधील स्टाेक कांगरी हिमशिखराकडे रवाना झाला हाेता. लेह- लडाखमध्ये स्टाेक कांगरी हे ६१२३ मीटर उंचीचे शिखर अाहे. १५ अाॅगस्ट राेजी स्टाेक कांगरी हे शिखर सर करून परतत असताना, ताेल जाऊन ताे १८ हजार फूट खाेल दरीत काेसळला. त्यानंतर मित्रांनी त्याला दरीतून बाहेर काढले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यास लेहमधील एसएनएम रुग्णालयात दाखल करण्यात अाले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने डाॅक्टरांनी त्यास पुढील उपचारासाठी दिल्लीतील रुग्णालयात हलवण्यास सांगितले.

त्यानंतर पद्मेश याचा भाऊ पंकजने काही राजकीय नेत्यांशी संपर्क साधून मदतीचे अावाहन केले. त्यानुसार महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री तसेच मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी लक्ष्य घालून पद्मेशला मदत मिळावी याकरिता हालचाली सुरू केल्या. लष्कराच्या हवार्इ रुग्णवाहिकेला विलंब हाेत असल्याने पद्मेशचे मित्र अाणि पुण्यातील नगरसेवक सचिन दाेडके यांनी स्वत: ११ लाख रुपयांचा चेक डाॅक्टर हिदायत खाम ह्युमन केअर एअर अॅम्ब्युलन्स या खासगी सर्व्हिसेसला दिला. तसेच पद्मेशला चांगले उपचार मिळावेत, यासाठी दाेडके स्वत: चंदिगडला रवाना झाले.  त्याच्या अपघाताचे वृत्त येताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.    

सरकारकडून खर्च : बापट  
चंदिगड येथे रुग्णालयात पद्मेशला दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी व्हेंटिलेटर नसल्याने  उपचारात अडथळे येत असल्याचे पंकज पाटील यांनी सांगितले. दरम्यान, पद्मेशच्या उपचाराचा खर्च सरकारतर्फे केला जार्इल. तसेच त्याला एअर अॅम्ब्युलन्सने पुण्यात अाणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत असल्याचे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...