आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune\'s Rajsabha Mp Vandana Chavan Talk On Malin & Other Incident

राज्यसभेत माळीण: \'निसर्ग धोक्याचे इशारे देतोय, जागे होऊ या\'- वंदना चव्हाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- राज्यसभेत आज दुपारी बोलताना खासदार वंदना चव्हाण)
नवी दिल्ली- निसर्ग धोक्याचे इशारे देतोय, आता तरी आपण सर्वजण जागे होऊ या, असे सांगत माळीण ही एक दुर्घटना होती असे पाहून चालणार नाही, असे प्रतिपादन राज्यसभेतील खासदार वंदना चव्हाण यांनी केले.
'नैसर्गिक आपत्त्ती' या राज्यसभेतील विषयावरील चर्चेत गुरुवारी दुपारी खासदार वंदना चव्हाण यांनी पुणे जिल्ह्यात झालेल्या माळीण दुर्घटनेचे उदाहरण देताना खासदारांचे या बाबींकडे लक्ष वेधले. निसर्ग सतत वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला इशारे देत असतो पण त्याकडे एका घटना किंवा दुर्घटना म्हणून पाहतो. त्यानंतर पुन्हा आपण आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनून जातो. मात्र, निसर्ग धोक्याचा इशारा देत आहे, आता तरी आपण सर्वजण जागे होऊ या, असे सांगत माळीण ही एक दुर्घटना म्हणून पाहून चालणार नाही, असे सांगितले. मागील काळात आपण एखाद्या घटनेकडे दुर्घटना म्हणून पाहत असे. पण भविष्यात कोणत्याही नैसर्गिक आपत्तीकडे ती एक घटना म्हणून न पाहता त्यामागील निसर्गाचा इशारा समजला पाहिजे. त्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखत होणा-या बदलाकडे बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे.
नैसर्गिक आपत्तीचा वाढता धोका भारताला असून तो निसर्ग निर्मित आहे की, मानव निर्मित आहे, याकडे आपण लक्ष दिलेले नाही. हे बदल व धोके कशामुळे होत आहे याचे संशोधन झाले पाहिजे. क्लायमेट चेंज (हवामानातील बदल) हा केवळ दक्षिण- उत्तर धृवावरील विषय नाही, तर हवामान बदलाचे परिणाम आपल्या दाराशी येवून ठेपले आहेत, आपण लक्ष द्यायला हवे. लोकांत जनजागृती केली पाहिजे.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने किल्लारी भूकंपापासून आपत्ती व्यवस्थापनाचा आदर्श घालून दिला आहे. आपत्ती निवारणाच्या कायद्याबद्दल चर्चा करीत असताना आपण स्थानिक स्वराज्य संस्था पातळीवर आता आपत्ती निवारण अधिकारी नियुक्त केला पाहिजे. याचबरोबर महाविद्यालयीन पातळीवरदेखील पर्यावरण, हवामान, निसर्ग, जीवसृष्ठी आदी विषयाचे गांभीर्य पोहोचविले पाहिजे, असे खासदार वंदना चव्हाण यांनी सांगितले.