आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या पोटाचा घेर जास्त, पुण्यातील पाहणीतील निष्कर्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: प्रतिकात्मक)
पुणे- व्यायामाकडे दुर्लक्ष, तुलनेने कमी कष्टाचे काम व आहारात वाढत चाललेले फास्ट फूडचे प्रमाण आदी घटकांमुळे पुण्यातील पुरुषांच्या तुलनेत महिलांचे पोट सुटण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे. पोटाचा घेर जास्त असल्याने या महिलांना पुरुषांपेक्षा डायबेटिस व हृदयविकाराचा धोका संभावत असल्याचे पाहणीत निष्कर्ष काढण्यात आला. 'इन्स्टिट्यूट ऑफ एक्सरसाइज अँड स्पोर्ट्स सायन्सेस' (आयईएसएस) या संस्थेने नुकतीच पुण्यात एक पाहणी केली त्यात ही माहिती पुढे आली आहे.
आईएसएस या संस्थेने पुणे शहरातील सुमारे एक हजारपेक्षा जास्त लोकांची पाहणी करण्यात आली आहे. त्यात सुमारे 600 पुरुष तर, 400 पेक्षा जास्त महिलांची तपासणी करण्यात आली. यातील 45 टक्के लोक चाळीशीच्या आतील होते तर, साठीच्या आतील 55 टक्के महिला-पुरुषांचा समावेश आहे. यात असे आढळून आले की, 55 टक्के पुरूषांना तर 69 टक्के महिलांना अधिक पोट असल्याचे दिसून आले. 20 ते 40 वयोगटातील 50 टक्के लोकांना पोट सुटलेले दिसले. तर, 40 ते 60 वयोगटातील 70 टक्के लोक ढेरपोटे आढळून आले. पोट वाढल्यामुळे साहजिकच चरबीचे प्रमाण वाढलेले असते. यामागे चुकीच्या वेळी जेवणे, आवश्यकतेपेक्षा जास्त आहार घेणे, फास्ट फूड, कोल्ड्रिंक्स- दारूचे सेवन करणे व सर्वात महत्त्वाचे उशीरा उठणे व उशीरा झोपण्यासह व्यायामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष ही कारणे असल्याचे पाहणीत आढळून आले. सर्व लोकांची लाईफस्टाईल, आहार, व्यसन, सवयी याची माहिती घेऊन सामूहिक निष्कर्ष काढण्यात आला आहे.
पुढे वाचा, विशी-तिशीतील युवकांना आढळले सुटलेले पोट...