Home »Maharashtra »Pune» Punite Make Smokefree Solar Shegdi

पुणेकराने बनवली धूररहित सौर शेगडी

प्रतिनिधी | Feb 20, 2013, 04:33 AM IST

  • पुणेकराने बनवली धूररहित सौर शेगडी

पुणे - इंधनाचे आणि ऊर्जेचे प्रश्न दिवसेंदिवस जटिल बनत आहेत. पेट्रोल, डिझेल, गॅस, रॉकेल आदी इंधनाची दरवाढ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात सहज उपलब्ध होणा-या गोव-या, पालापाचोळा आणि काट्याकुट्या अशा इंधनावर चालणारी बहुउपयोगी शेगडी पुणेकर शंकर पाचारणे यांनी तयार केली आहे. सोलर पॅनलच्या आधारे चालणारी ही शेगडी वीजनिर्मितीही करू शकते आणि त्यावर बल्बही लागतो. शिवाय मोबाइल चार्जिंगची सुविधाही आहे.

अगदी आटोपशीर आकाराच्या या धूरविरहित शेगडीला पाचारणे यांनी ‘कोहीनूर’ असे नाव दिले आहे. शेगडीच्या संशोधनाविषयी ते म्हणाले की, ‘ग्रामीण भागात सरासरी 12 ते 16 तास लोडशेडिंग आहे. गॅस, रॉकेलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे इंधनाला पर्याय शोधण्याचा प्रयत्न गेली दोन वर्षे करत होतो. कोहीनूर शेगडी हे त्या प्रयत्नांचे फलित आहे. शेण, पालापाचोळा, काट्याकुट्या यांची उपलब्धता ग्रामीण भागात सहज होऊ शकते. त्यासाठी खर्चही नसतो. शेगडीची बॅटरी सोलर पॅनलवर चालते. सूर्यप्रकाशाची तर आपल्याकडे मुबलकता आहे. ही छोटी शेगडी कुठेही हलवता येते. सोलर पॅनल एकदा चार्ज केले की शेगडी चार दिवस चालते. शेगडीवर कुठल्याही धातूची भांडी वापरता येतात. ज्योत कमी-जास्त करता येते. या शेगडीची किंमतही परवडणारी आहे.

उपयुक्तता अशी आहे
*सोलर पॅनलमुळे देखभालीचा खर्च नाही
*ज्योत नियंत्रण सुविधा
*चटका नाही की फुंकावी लागत नाही
*स्टेनलेस स्टील बॉडी
*धूर वाहून नेणारी नळी
*मोबाइल चार्जिंग आणि बल्बची सोय
*शेण, पालापाचोळा यांचाही वापर
*किंमत सुमारे रू 4500

Next Article

Recommended