आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील शीख बांधव महाराष्ट्रीयन मातीशी एकरूप झालेत- राज ठाकरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुरस्कार सोहळ्यात बोलताना राज ठाकरे... - Divya Marathi
पुरस्कार सोहळ्यात बोलताना राज ठाकरे...
पुणे- महाराष्ट्रात लाखो शीख बांधव राहतात. ते इथल्या भाषा, संस्कृतीशी एकरूप झाले आहेत. त्यांनी कुठेही मतदार तयार केले नाहीत की मतदारसंघ. त्यामुळे पंजाबी लोक ख-या अर्थाने महाराष्ट्रीयन व मराठीमय झाल्याचे कौतुकाद्गार मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काढले. आमचा आदर तुम्ही करा, आम्ही तुमचा नक्कीच आदर करू हे सांगण्यासही राज ठाकरे विसरले नाहीत.
पुण्यातील सरहद या सेवाभावी संस्थेचा संत नामदेव पुरस्कार पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांना आज देण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, सरहदचे संजय नहार आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, प्रकाशसिंह बादल यांच्याबद्दल ऐकून होतो मात्र आज त्याचा प्रत्यय आला. आज प्रत्यक्ष भेटून व बोलून बादल यांच्याबाबतचा आदर आणखीनच वाढला. आज राजकारणात अशी फार कमी लोकं आहेत. त्यामुळेच मी त्यांच्या पाया पडलो. देशातील सर्वात तरूण मुख्यमंत्री ते सर्वात ज्येष्ठ मुख्यमंत्री बादलसाहेब का ठरले हे यातून कळले. राज्यात लाखो शीख बांधव गुण्यागोविंदाने राहत आहेत. शीख बांधव जिथेही राहिले त्यांनी कधीही कुठे आपला मतदारसंघ निर्माण केलेला नाही. जेथे जेथे जा त्या मातीशी एकरुप व्हा एवढेच आमचे म्हणणे आहे. मराठी माणूसदेखील पंजाबी लोकांसारखाच आहे. इतर राज्यातील लोकांनीही याचे अनुकरण केले पाहिजे अशी अपेक्षा राज यांनी व्यक्त केले.
'बादल' व 'घुमान'वरून राज यांच्या कोट्या- राज ठाकरे यांनी छोटेखानी भाषणात कोणतेही राजकीय भाष्य केले नाही मात्र पंजाबी महाराष्ट्रीयन झाल्याचे सांगत त्यांनी काही कोट्या केल्या. पावसाळ्याच्या दिवसात पंजाबचे मुख्यमंत्री 'बादल' आले आहेत. हा एक अनोखा योगायोगाच म्हणावा लागेल. या निमित्ताने महाराष्ट्रातील दुष्काळ दूर व्हावी हीच इच्छा अशी कोटी करताच सभागृहात हास्याचे कारंडे उडाले.
नुकतेच पंजाबमधील घुमान येथे झालेल्या साहित्य संमेलनाचा धागा पकडून राज म्हणाले, घुमान साहित्य संमेलनासाटी मला निमंत्रण होतं. पण आधीच साहित्य संमेलनात वाद-विवाद असतात. तेथे मी जाऊन आणखी वाद नको म्हणून गेलो नाही. तसेही त्याचकाळात माझी तब्बेत बरी नव्हती त्यामुळे मी आपलं 'गप्प घुमान' घरीच बसून राहिलो.
पुढे वाचा व पाहा, मुख्यमंत्री फडणवीस, प्रकाशसिंह बादल काय काय म्हणाले....
बातम्या आणखी आहेत...