आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Punjab Ghuman Marathi Sahitya Sanmelan News In Marathi

पंजाबमधील घुमान येथे होणाऱ्या संमेलनाध्यक्षासाठी चार जण उत्सुक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पंजाबमधील घुमान येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक मंडळींनी यापूर्वीच प्रचाराचा नारळ फोडला आहे. संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक कामत, डॉ. श्रीपाल सबनीस तसेच भारत सासणे व मधुसूदन घाणेकर यांनी अध्यक्षपदाच्या नडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याचे रवारी स्पष्ट झाले. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य म्हणाल्या, अध्यक्षपदासाठी अर्ज करण्याची मुदत १३ ते २३ सप्टेंबर असेल. ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येईल. नऊ ऑक्टोबरपासून मतदारांना मतपत्रिका पाठवल्या जातील. अध्यक्षपदासाठीची मतमोजणी व निकाल १० डिसेंबरला जाहीर केला जाईल.