आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे - ‘...नो, नो. ही हॅज अ पॉइंट. आन्सर हिम,’ असे फर्मान खुद्द काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून सुटले आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना नेमके काय उत्तर द्यावे ते सुचेनासे झाले. निलंबित खासदार सुरेश कलमाडी यांच्या पुणे फेस्टिव्हलला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावल्यासंबंधी प्रश्नावर हा प्रकार घडला.
राहुल यांच्या दौ-यात बुधवारी त्यांचा पत्रकारांशी संवाद सुरू होता. मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनी कलमाडी यांच्या पुणे फेस्टिव्हलला हजेरी लावली. हा उमेदवारीसाठी पक्षाकडून दिला गेलेला सिग्नल आहे काय, असा थेट प्रश्न आला. त्यावर राहुल बोलण्याआधीच मुख्यमंत्री मध्येच बोलले. ‘मी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी गेलो होतो. त्याचा व तिकीट देण्याचा संबंध नाही, असे ते म्हणाले. राष्ट्रीय प्रवक्ते अजय माकन यांनी त्यांची पाठराखण केली. मुख्यमंत्री पुन्हा बोलणार तेवढ्यात राहुल त्यांना म्हणाले, प्रश्नात तथ्य आहे. यामुळे पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होतो. तुम्ही खुलासा केला पाहिजे.
राहुल यांचीही प्रश्नाला बगल
‘भ्रष्ट लोकांना काँग्रेस पाठीशी घालत नाही. त्यांच्याविरुद्ध अॅक्शन घेतली असल्याचे मीडिया लक्षात घेत नाही,’ असे राहुल म्हणाले. अर्थात त्यांनी स्वत:ही कलमाडी यांना उमेदवारी देणार का हा प्रश्न अनुत्तरितच ठेवला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.