आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • R.R. Patil Ignoring Anandvan, Allegation By Amte

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘आनंदवन’ला डावलून आबांनी पारितोषिक दिले अण्‍णांच्या गावाला, आमटेंचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ग्रामस्वच्छता अभियानाचे पहिले पारितोषिक देताना निकषांचे कारण पुढे करून तत्कालीन ग्रामविकासमंत्री आर. आर. पाटील यांनी ‘आनंदवन’ला डावलून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या गावाला ते दिले, असा आरोप ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांनी सोमवारी केला.

क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाचा क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार डॉ. आमटे यांना विट्यात प्रदान करण्यात आला त्या वेळी त्यांनी खंत व्यक्त केली. आमटे म्हणाले, ‘आनंदवन हे एकलव्य विद्यापीठ आहे. इथे कुष्ठरुग्णांना परमेश्वर मानून त्यांची सेवा केली जाते. बाबांनी सफाई कामगारांची देशातील पहिली संघटना बांधली. याचा खुद्द गांधीजींनी गौरव केला होता. हीच परंपरा आम्ही चालवली. राज्यात 2001 मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाला सुरुवात झाली तेव्हा मात्र पहिला पुरस्कार देताना ‘आनंदवन’ला डावलले. नियमावलीचा बागुलबुवा करून आर.आर. पाटील यांनी तो पुरस्कार अण्णा हजारेंच्या गावाला दिला,’ असा आरोप त्यांनी केला.