आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • R.R.Borade News In Marathi, Marathi Literature, Divya Marathi

कथाकथनाची कला लुप्त होतेय,रा. रं. बोराडे यांची खंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - श्रोत्यांना जोडणारा, गुंतवून ठेवणारा कथाकथनासारखा कलाप्रकार लुप्तप्राय होत असल्याची खंत ज्येष्ठ कथाकथनकार प्रा. रा. रं. बोराडे यांनी व्यक्त केली. जागतिक कथाकथन दिवसाचे औचित्य साधून ‘दिव्य मराठी’ने प्रा. बोराडे यांच्याशी संवाद साधला.


बोराडे म्हणाले, कथाकथन ही मौखिक कला आहे. तिचे प्राचीन वेदवाड्मयाशी नाते आहे. प्राचीन वाड्मय मौखिक परंपरेनेच आज आपल्यापर्यंच पोहोचले आहे. ते खर्‍या अर्थाने वाक्मय (वाणीरूप) होते. गुरूने कथन केलेले ज्ञान शिष्याने फक्त श्रवणभक्तीने लक्षात ठेवायचे आणि त्यानुसार आचरण करायचे, अशा पद्धतीने ही मौखिक परंपरा सुरू राहिली. मुद्रित माध्यमाचा शोध तर अगदी अलीकडचा आहे. त्यानंतर वाड्मयाला लिखित आणि मुद्रित स्वरूप प्राप्त झाले, तरीही मनुष्याची श्रवणाची आवड आणि ओढ कमी झाली नाही. आजही मी क्वचित कथाकथनासाठी गेलो, की ऐकण्यासाठी गर्दी उसळते. गेल्या काही वर्षांपासून हा कलाप्रकार जणू लुप्त झाला आहे. युवा पिढीने आता कथाकथन परंपरेची धुरा खांद्यावर घ्यायला हवी, असेही ते म्हणाले.


कथाकथन हा वाचिक अभिनय : बोराडे
कथाकथन हे वाचिक अभिनयाचे उत्तम उदाहरण. कथेतील वातावरण, पात्रयोजना, व्यक्तिरेखा, संवादांची मजा.हे सारे कथाकथनकाराने श्रोत्यांपर्यंत परिणामकारक रीतीने पोहोचवायचे असते. कथाकथनकाराचे बोट धरून श्रोतेही जणू कथेच्या प्रवासाला निघत असतात. त्यांचा प्रवास आनंददायी करण्याची जबाबदारी कथाकथनकाराची असते, असे बोराडे यांनी स्पष्ट केले.