आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • R.K. Laxman In Hospital, But Health Condition Stable

आर. के. लक्ष्मण यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार, प्रकृती स्थिर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांची प्रकृती गंभीर असली, तरी स्थिर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने लक्ष्मण यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. लक्ष्मण हे मधुमेहाचे रुग्ण असून त्यांचा रक्तदाबही कमी होता. तसेच त्यांना युरिनरी इन्फेक्शन झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. तसेच काही वर्षांपूर्वी त्यांना पक्षाघात झाल्याने ते कायम व्हीलचेअरवर असतात. रुग्णालयात त्यांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या.

त्यांना जीवरक्षक यंत्रणेवर ठेवण्यात आले आहे. तसेच रविवारी डायलिसिस करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत किंचित सुधारणा झाल्याची माहिती लक्ष्मण यांचे निकटवर्तीय कैलास भिंगारे यांनी दिली.