जामखेड- गृहमंत्री आर आर पाटील यांनी आज जामखेड खर्डा येथे जाऊन पीडित आगे कुटुंबियांची भेट घेतली. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना आजही घडणे दुर्देवी आहे अशा शब्दात नितीन याच्या हत्येवर आबांनी प्रतिक्रिया दिली. तसेच आगामी काळात राज्यात 6 फास्ट ट्रॅक कोर्ट सुरु करणार असल्याची घोषणा केली.
गृहमंत्री आर आर पाटील यांनी जामखेड तालुक्यातील खर्डा गावात जाऊन पीडित आगे कुटुंबियांची भेट घेतली तसेच त्याचे सांत्वन केले. तसेच यापुढे अशा घटना घडू नयेत याची आपण सर्वांनीच समाजातील एक म्हणून जबाबदारी घेतली पाहिजे असे म्हटले. फक्त अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे त्यामुळे राज्यात सर्व 6 विभागात 6 फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन केली जातील अशी माहितीही पाटील यांनी दिली.