आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेखकांना पुरस्कारांचा हव्यास : रा. रं. बोराडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ‘वाड्मयीन पुरस्कारांचे महत्त्व मला मान्य आहे. पुरस्कार लेखकाला लेखनासाठी बळ नक्कीच देतात, पण लेखकांनी पुरस्कार व सन्मानांचा हव्यास बाळगू नये. पद्मर्शी, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक जेव्हा गल्लीबोळातले पुरस्कार स्वीकारतात, तेव्हा मला खेद वाटतो,’ अशी परखड टीका ज्येष्ठ लेखक प्रा. रा. रं. बोराडे यांनी रविवारी पुण्यात केली.

मात्र, याच कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रा. बोराडे यांनी आपण स्वत: विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याची मनीषाही सूचक पद्धतीने व्यक्त केली. त्यांच्या बोलण्यातील हा विरोधाभास साहित्यिक वतरुळात चर्चेत राहिला.

दुसर्‍या प्रबोधनकार ठाकरे विचार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रा. बोराडे बोलत होते. गजानन कीर्तिकर उद्घाटक म्हणून उपस्थित होते. लेखक वासुदेव मुलाटे, उत्तम बंडू तुपे, रामदास फुटाणे, कवी किशोर कदम आदी या वेळी उपस्थित होते.

बोराडे म्हणाले, ‘लेखकाने सन्मान जरूर स्वीकारावा; पण त्याची हाव नसावी; परंतु दुर्दैवाने पुरस्कारांचा हव्यास बाळगणार्‍या लेखकांची रांग वाढती आहे. पद्मर्शी, साहित्य अकादमीचा सन्मान मिळवणार्‍यांनाही छोट्या पुरस्कारांचा मोह टाळता येत नाही, हे खेदजनक आहे.’

दरम्यान, पुरस्कार वितरण समारंभात बोराडे म्हणाले, माझे विद्यार्थी असणारे प्रा. फ. मुं. शिंदे हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले असल्याने मला आता अध्यक्षपदात रस नाही. मात्र, विश्व साहित्य संमेलनाचा पर्याय खुला आहे. साहित्य महामंडळाच्या पदाधिकार्‍यांनी या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी माझी निवड केल्यास मी हे पद आनंदाने स्वीकारेन.