आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सल्लूच्या स्वभावामुळे मुलाखत टाळली, रेडिआे निवेदक अमीन सयानी यांची कबुली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळात सुरुवातीच्या कालखंडात अनेक दिग्गज संगीतकार, गायक, कलावंतासह एकाहून एक सुमधुर गाण्यांचा नजराणा रसिंकासमाेर रेडिआेच्या माध्यमातून सादर केला. अभिनेता शाहरुख खान, आमिर खान यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीला मी त्यांच्या मुलाखती रेडिआेवर घेतल्या. मात्र, सुरुवातीपासूनच सलमान खानच्या वादग्रस्त स्वभावामुळे त्याची मुलाखत घेणे मी टाळले, अशी कबुली ज्येष्ठ रेडिओ निवेदक अमीन सयानी यांनी शनिवारी पुण्यात दिली.
आकाशवाणी आणि विविध भारती प्रसारण सेवा तसेच इतर खासगी राेडिआे वाहिन्यांवर अमीन सयानी यांनी ५४ हजारांहून अधिक कार्यक्रम व १९ हजारांहून अधिक जाहिराती/जिंगल्स ध्वनिमुद्रित केल्या आहेत. त्यानिमित्त आशय सांस्कृतिक आयाेजित १३ व्या पुलाेत्सवमध्ये त्यांना ‘पु.ल.स्मृती’ सन्मान देण्यात आला. या वेळी ते बोलत होते. या वेळी पुलाेत्सवाचे आयाेजक वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार उपस्थित हाेते.

सयानी म्हणाले, पूर्वीचे संगीत हे मनाला भिडणारे हाेते, तर आताचे संगीत हे तनाला भिडणारे असून तरुणाई केवळ संगीत एेकून नाचते एवढेच त्याचे महत्त्व आहे. चित्रपट संगीत हे आपल्या भारतीय परंपरेचे महत्त्वाचे अंग राहिले असून त्याने सर्वांना एकत्रितरीत्या बांधून ठेवले आहे. सुरुवातीच्या काळात माझे हीराे बनण्याचे स्वप्न हाेते. रेडिआेत निवेदक झाल्यावर अनेक कलाकारांच्या मुलाखती मी घेतल्या. मात्र, हीराे बनण्याचे माझे स्वप्न कधीही पूर्ण झाले नाही, असेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.

पु.लं.चे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू
पु.ल.देशपांडे यांच्या नावाने मला मिळणारा पुरस्कार हा बहुमूल्य असून आपल्या कामास प्रेरित करण्याचे काम पुरस्कार करत असल्याची भावना अमीन सयानी यांनी व्यक्त केली. संघर्षाच्या काळात अनेक पुरस्कार मिळाल्यामुळेच मी जीवनात यशस्वी हाेऊ शकलाे. पु.ल. देशपांडे यांचे व्यक्तिमत्त्व हे अष्टपैलू हाेते. ते लिखाण, नाटक, विनोद, संगीत अशा सर्वच क्षेत्रांत कार्यरत राहिल्याने माझे आर्दश राहिल्याचे सयानी म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...