आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'चितळे बंधु मिठाईवाले\'चे संस्थापक भाऊसाहेब चितळे यांचे निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- 'चितळे बंधु मिठाईवाले'चे संस्थापक रघुनाथ उर्फ भाऊसाहेब चितळे यांचे रविवारी सकाळी पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. भाऊसाहेब चितळे यांनी 1950 मध्ये चितळे बंधू मिठाईवाले या कंपनीची स्थापना केली. परिश्रम, सचोटी व ग्राहकांच्या विश्वासाच्या जोरावर भाऊसाहेबांनी आपल्या व्यवसायाच्या देशभरात विस्तार केला.

भाऊसाहेब यांचे वडील भास्कर गणेश उर्फ बाबासाहेब चितळे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात, 1940 मध्ये अत्यंत प्रतिकृल परिस्थितीत डेअरी व्यवसाय सुरु केला. भिलवाडी व परिसरातील शेतकर्‍यांकडून दूध गोळा करुन ते दूध आणि दुधाचे दर्जेदार पदार्थ ग्राहकांपर्यंत पोहोचवत होते. भाऊसाहेबांनी मात्र, वडिलांचा व्यवसाय फक्त डेअरीपुरता दूध, दही, लोणी, तूप, श्रीखंडासोबतच लाडू, मोदक, करंज्या व बर्फी आदी पदार्थ बाजारात आणले. चितळे यांची खुसखुशीत खमंग बाकरबडी तर सातासमुद्रापार पोहोचली आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, चितळ्यांची बाकरवडी...अस्सल मेड इन पुणे
बातम्या आणखी आहेत...