आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Bajaj Bat For Kejriwal But Denies The Report To His Son Rajiv Joins In Aap

\'राजीव बजाज राजकारणात जाणे हे म्हणजे केजरीवालांनी मोटारी बनविण्यासारखे\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- माझा मुलगा राजीव बजाज यांनी राजकारणात प्रवेश करणे म्हणजे अरविंद केजरीवाल यांनी मोटारी बनविण्यासारखे आहे, अशी टोलेबाजी करीत राहुल बजाज यांनी राजीव बजाज यांच्या आपमधील तथाकथित प्रवेशाचे वृत्त फेटाळून लावले. मात्र केजरीवाल यांची भेट राजीव बजाज यांनी तीन वेळा घेतली होती. मीसुद्धा केजरीवाल यांना भेटलो असल्याचे राहुल बजाज यांनी स्पष्ट केले. मात्र, राजीव आपमध्ये जाणार हे वृत्त खोटारडे व खोडसाळ असल्याचे स्पष्ट केले. राहुल बजाज हे पिंपरी-चिंचवडमधील आपल्या कंपनीच्या आवारात एका कार्यक्रमासाठी आले असताना बोलत होते.
मागील आठवडयात राजीव बजाज यांची एका टीव्हीवर मुलाखत घेण्यात आली होती. त्यात राजीव बजाज यांनी केजरीवाल यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. त्यानंतर राजीव बजाज दिल्लीतून आपच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे वृत्त अनेक आघाडीच्या वृत्तपत्रात आले होते. त्या पार्श्वभूमीवर बजाज यांना पुण्यातील पत्रकारांनी प्रश्न विचारले असता त्यांनी राजकारणावर सडकून टीका केली. देशातील राजकारण वाईट स्तरावर जाऊन पोहोचल्याचे सांगत केजरीवालांसह नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले. भ्रष्टाचाराशिवाय भारतात काही काम होत नाही त्याला सर्वजणच जबाबदार असल्याचे सांगत सर्वांनाच धारेवर बजाज यांनी धरले.
एका आघाडीच्या अर्थविषयक इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या राजीव बजाज यांच्या आप प्रवेशाच्या वृत्ताबाबत पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर बजाज यांनी त्याबाबत संताप व्यक्त केला. बजाज म्हणाले, केजरीवाल यांची राजीव यांच्यासह माझीही भेट झाली. त्यांचा उद्योगपतींना व उद्योगाना विरोध नसून गैरमार्गाचा वापर करणा-या प्रवृत्तीला त्यांचा विरोध आहे. केजरीवाल यांनी याबाबत अतिशय सावध आहेत. केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले हे साधी-सोपी गोष्ट नव्हे. मात्र त्यांनी 49 दिवसात राजीनामा दयावा लागला आहे. खरे तर त्यांनी राजीनामा द्यायला नको होता. मुख्यमंत्रीपदी राहूनच त्यांनी व्यवस्थेशी संघर्ष करायला हवा होता. पण राजीनामा दिल्यानंतर त्यांची लोकप्रियता घसरणीला लागली असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे वाचा, राहुल बजाज काय म्हणाले केजरीवालांविषयी....