पुरंदरचे काँग्रेसचे उमेदवार संजयकाका जगताप यांच्या प्रचारसभेत राहुल गांधी सासवड येथे बोलत होते. राहुल म्हणाले, मोदींनी लोकसभा निवडणुकीत भरमसाठ आश्वासने देऊन विजय संपादन केला. त्यावेळी त्यांनी 'अच्छे दिन आएंगे' अशी साद घातली. आता त्यांची भाषा बदलली आहे. लवकरच सर्व काही ठीक होईल असे ते आता बोलू लागले आहेत. मोदी सरकार हे गोरगरिबांचे नाही तर उद्योगपती, धनदांडग्याचे आहे. ते सांगतात आम्ही हे केले, मी ते केले. कोणाही एका व्यक्तीमुळे देश उभा राहत नाही तर खाली येत नाही. हा भारत देश शेतक-यांनी, मजूरांनी व कामगारांनी घडविला आहे. प्रत्येकाने
आपापल्या परीने योगदान दिले आहे. मात्र, मोदी उठसूठ मागील 60 वर्षात काँग्रेस सरकारने काय केले असे विचारत आहेत. ज्या गोष्टीचा ते स्वत सुखसुविधा म्हणून उपभोग आहेत तरीही ते असे विचारत आहे. ज्या पुण्यातून तयार होणा-या मर्सिडेज बेंन्झमध्ये दिसतात, जो मोबाईल कानाला लावतात. ज्या सोशल मिडियाची बात करतात व आयटीबाबत बोलतात त्याची मुहूर्तमेढ कोणी रोवली हे ते का सांगत नाहीत असा हल्लाबोल राहुल यांनी मोदींवर चढविला.
भाजपचे हे सरकार काहीही करणार नाही. तो लोकांना उल्लू बनवू शकतात, अशा शब्दात त्यांनी टीका केली.