आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rail Budget, 20 New Train For Maharashtra For This Year

RAIL BUDGET: महाराष्ट्राच्या वाट्याला यंदा नव्या 20 रेल्वे गाड्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- रेल्वेमंत्री मल्लिकार्जून खरगे यांनी आगामी वर्षाचा रेल्वेचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात देशभर एकूण 72 नवीन रेल्वे गाड्यांची घोषणा करण्यात आली. त्यापैकी महाराष्ट्राच्या वाट्याला राज्यातून नव्याने जाणाऱ्या 9 प्रिमियम रेल्वे गाड्या आणि 11 नवीन एक्सप्रेस गाड्या आल्या आहेत. या गाड्यांमुळे राज्यातील प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर सोय होणार आहे.
तर चला पाहूया, राज्याच्या वाट्याला 20 नवीन रेल्वे गाड्याची माहिती...
1) हावडा -पुणे वातानुकुलीत एक्सप्रेस मार्गे मनमाड- नागपूर
(आठवडयातून दोन वेळा)
2) मुंबई - हावडा वातानुकुलीत एक्सप्रेस मार्गे नागपूर (आठवडयातून एक वेळा)
3) मुंबई – पाटणा वातानुकुलीत एक्सप्रेस (आठवडयातून दोन वेळा)
4) बांद्रा -अमृतसर एक्सप्रेस ( आठवडयातून एक वेळा)
5) पटना- बंगळूरू एक्सप्रेस मार्गे नागपूर(आठवडयातून एक वेळा)
6) मुंबई- गोरखपूर एक्सप्रेस (आठवडयातून दोन वेळा)
7) यशवंतपूर – कटरा एक्सप्रेस मार्गे नागपूर (आठवडयातून एक वेळा)
8) निझामुद्दीन– मडगाव वातानुकुलीत एक्सप्रेस मार्गे वसई रोड (आठवडयातून एक वेळा)
9) यशवंतपूर – जयपूर वातानुकुलीत एक्सप्रेस मार्गे पुणे, वसई रोड (आठवडयातून एक वेळा)
- अशा आहेत नवीन एक्सप्रेस गाडया
1) औरंगाबाद – रेणुगुंटा एक्सप्रेस मार्गे परभणी (आठवडयातून एक वेळा)
2) बांद्रा टर्मिनस- लखनौ जंक्शन एक्सप्रेस (आठवडयातून एक वेळा)
3) गोरखपूर - पुणे एक्सप्रेस (आठवडयातून एक वेळा)
4) हुबळी - मुंबई एक्सप्रेस मार्गे सोलापूर (आठवडयातून एक वेळा)
5) कानपूर -बांद्रा टर्मिनस एक्सप्रेस (आठवडयातून एक वेळा)
6) मुंबई – चेन्नई एक्सप्रेस मार्गे पुणे (आठवडयातून एक वेळा)
7) मुंबई - गोरखपूर एक्सप्रेस (आठवडयातून एक वेळा)
8) मुंबई – करमळी (गोवा) वातानुकुलीत एक्सप्रेस मार्गे रोहा (आठवडयातून एक वेळा)
9) नांदेड - औरंगाबाद एक्सप्रेस मार्गे परभणी (आठवडयातून एक वेळा)
10) नागपूर - रेवा एक्सप्रेस (आठवडयातून एक वेळा)
11) पुणे -लखनौ एक्सप्रेस (आठवडयातून एक वेळा)