आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार करणारा एजंट अटकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - रेल्वेच्या ई-तिकीट संकेस्थळावर ठरावीक वेळेत अनधिकृतपणे प्रवाशांचे ई- तिकीट बुकिंग करून ते जादा भावाने विक्री करणाऱ्या एका रेल्वे एजंटला गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलच्या पथकाने अटक केली आहे. रामकुमार वृंदावन यादव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून दोन लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रॉपर्टी सेलच्या वरिष्ठ पोलसि निरीक्षक सुषमा चव्हाण यांनी सांगितले की, रेल्वेच्या तत्काळ ई-तिकिटांचे बुकिंग करून त्याची विक्री करणाऱ्या एका एजंटची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार प्रॉपर्टी सेलच्या पथकाने रामकुमार यादव याच्या कौढव्यातील घरावर छापा टाकला असता, ताे बुकिंगचे काम करताना आढळला. अशाचप्रकारे त्याने ४० ई तिकिटांची बुकिंग केली होती.