आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येरे घना येरे घना....येत्या चार दिवसांत पावसाची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- नैऋत्य मोसमी पावसाची उत्तरसीमा कायम आहे. मात्र, येत्या चार दिवसांत साधारणत: १९ जूनपासून राज्यात विविध ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. कर्नाटकातील कारवार, गदगपर्यंत आलेला पाऊस थोडा पुढे सरकला असून पुढील वाटचालीस अनुकूल ठरतील असे बदल घडत आहेत.

गेल्या २४ तासांत कोकण-गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. चार दिवसांत मान्सूनची वाटचाल गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग दाखल होण्यासाठी अनुकूल आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...