आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोकण, विदर्भात मुसळधार, पुण्यात संततधार; 2-3 दिवस वरुण‘याेगा’चेच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेल्हापूर शहरातील पंचगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली असून नदीपात्रातील मंदिरांना अक्षरश: जलसमाधी लाभली आहे. या नदीपात्राच्या परिसरात प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. - Divya Marathi
काेल्हापूर शहरातील पंचगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली असून नदीपात्रातील मंदिरांना अक्षरश: जलसमाधी लाभली आहे. या नदीपात्राच्या परिसरात प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे - नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) कोकण आणि विदर्भावर मेहेरबान झाला आहे. शनिवारी व रविवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. राज्यातील अनेक गावांमध्ये एका महिन्यात पडणारा पाऊस गेल्या २४ तासांत रत्नागिरी आणि चंद्रपुरात बरसला, तर रत्नागिरीतील संगमेश्वर येथे राज्यातील सर्वाधिक २३० तर चंद्रपूर येथे २०० मिलिमीटर पावसाची नाेंद झाली. गेल्या आठवड्यापासून चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत असणार्‍या पुणेकरांनीही रविवारी पावसाने चिंब केले. सोमवारी पुणे व पिंपरी परिसरात संततधार सुरु आहे.

रविवारी मान्सूनने उत्तरेकडे आणखी मजल मारली. छत्तीसगड, ओरिसा आणि पश्चिम बंगालच्या उर्वरित भागात तसेच झारखंडच्या काही भागात मान्सून दाखल झाला. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि गुजरात ते केरळपर्यंतच्या किनारपट्टीवरील द्रोणीय स्थिती यामुळे मान्सून सक्रिय झाला आहे. पुढचे दोन-तीन दिवस या हवामानात बदल होणार नसल्याने पावसाचा जोर टिकून राहील, असे पुणे वेधशाळेच्या सूत्रांनी सांगितले.
दरम्यान गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. कोकणातील अनेक गावांना शंभर मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाने झोडपले. काही गावांमध्ये तर पावसाने दोनशे मिलिमीटरचा आकडा ओलांडला. विदर्भातही सर्वदूर सरासरी पन्नास मिलिमीटर पाऊस झाला. तुलनेने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होता.

खान्देशातही प्रामुख्याने कोरडे वातावरण होते. गेल्या २४ तासात मुंबई शहरात ८६.८५ मिमी, पूर्व उपनगरांत ५९.२२ मिमी तर पश्चिम उपनगरात ७९.२९ मिमी पावसाची नोंद झाली. रविवारी िदवसभर तिन्ही मार्गावरच्या लोकल १५ मिनीटे उशीराने धावत होत्या. परंतु रविवार सुट्टीचा िदवस होत्या. त्यातच मेगा ब्लाॅक रद्द केल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला. पावसामुळे ८५ वृक्ष उन्मळून पडल्याच्या, १६ ठिकाणी शाॅर्टसर्किट झाल्याच्या आणि ३५ ठिकाणी पाणी तुंबल्याच्या तक्रारी आल्या आहेत. लोकल गाड्यांचे वेळापत्रक पूर्ववत झाले असले तरी लांब पल्ल्याच्या गाड्यांचा खोळंबा सुरुच होता. सीएसटी ते हैद्राबाद, एलटीटी ते कामाख्य एक्सप्रेस रद्द कराव्या लागल्या. सीएसटी ते मडगावी (मांडवी) एक्सप्रेस आिण सीएसटी ते रत्नगिरी पॅसेंजर पनवेल येथूनच रवाना करण्यात आली.

महाबळेश्वरमध्ये १३.५ इंच पाऊस
महाबळेश्वर - गेल्या दाेन दिवसांपासून महाबळेश्वरमध्ये नियमित सुरू असलेल्या पावसाचा शनिवारपासून चांगलाच जाेर वाढला आहे. रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत तब्बल १८४ मिलिमीटर म्हणजेच ७.५ इंच पावसाची नाेंद झाली. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १५३.४ मिमी (६.१ इंच) पाऊस बरसला. म्हणजेच ३३ तासांमध्ये १३.५ इंच पाऊस बरसला.

पंचगंगा नदी दुथडी
कोल्हापूर - दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्याला झोडपून काढले आहे. शनिवारपासून सुरू झालेल्या दमदार पावसाने पंचगंगेचे पात्र दुथडी भरून वाहू लागले. तसेच जिल्ह्यातील बारा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गेल्या दाेन दिवसांत ७१८ मिमी , तर एक जून पासून २१३२ मिमी पावसाची नाेंद झाली. करवीर, हातकणंगले, गडहिंग्लज आणि शिरोळ येथे मध्यम पाऊस असला तरी उर्वरित आठ तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे.

मुंबईत मायलेकीचा, तर काेकणात चाैघांचा मृत्यू
मुंबईत सलग तिसर्‍या दिवशी रविवारी संततधार कायम हाेती. शनिवारी रात्री वांद्र्यातील फूल गल्लीत इमारतीचे बांधकाम चालू असताना पावसामुळे काही भाग खचून झालेल्या दुर्घटनेत यास्मीन इम्रान शेख (२७) आणि सरीना इम्रान शेख (१३) य मायलेकींचा मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील पुरात एक वाहून गेला तर दरड काेसळून महिलेचा मृत्यू झाला. सिंधुदुर्गात वीज पडून दाेघे ठार झाले. दुसरीकडे चंद्रपूरमध्ये खाणीत साचलेल्या पाण्यात बुडून इंिजनिअर मेकॅनिकल एस. एम. ढोबळे यांचा मृत्यू झाला.
बातम्या आणखी आहेत...